Property Card : पुण्याच्या धर्तीवर मुंबईतही प्रत्येक घराला मिळणार 'प्रॉपर्टी कार्ड'

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे;  मुंबई उपनगरातील ५ हजार कोटींची सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त


मुंबई : पुण्याच्या धर्तीवर आता मुंबईतील प्रत्येक घराला हक्काचे 'प्रॉपर्टी कार्ड' मिळणार आहे. "आधी मोजणी, मग नोंदणी आणि त्यानंतर थेट प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल. यामुळे 'लँड टायटलिंग' करणारी मुंबई देशात पहिली ठरेल," अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली. मुंबई उपनगरातील धनदांडग्यांच्या घशात जाणारी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची शासकीय जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणमुक्त केल्याचे कौतुक करत, सरकारी जमिनी बळकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.



अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानात' महसूलमंत्री बोलत होते. यावेळी सर्वसामान्यांची अडवणूक करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत तंबी दिली. "महसूल विभागातील अधिकाऱ्यांची एक चुकीची सही सर्वसामान्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करू शकते, कोणाचा जीव घेऊ शकते. अधिकारी जेव्हा जनतेला वेठीस धरतात, तेव्हा तीव्र मनस्ताप होतो. जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर सोपवली असून, अधिकाऱ्यांनीही जनतेच्या मनातले काम केले पाहिजे," अशा शब्दांत बावनकुळे यांनी सुनावले.


">ते म्हणाले, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने नियमावलीत मोठे फेरबदल केले आहेत. तुकडा बंदी कायदा लागू केल्यामुळे आता घरांच्या अधिकृत नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, पुनर्वसनातील घरे विकण्यासाठी असलेली १० वर्षांची अट आता ५ वर्षांवर आणण्यात आली आहे. गरिबांना दिलासा देत, अनधिकृत घरे नियमित करण्यासाठीचे शुल्क १० टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच 'लँड टायटलिंग' कायद्यामुळे घराचा संपूर्ण डेटा सुरक्षित राहील आणि फसवणुकीला आळा बसून थेट ऑनलाइन खरेदी-विक्री शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.


शर्थभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई


"ज्या उद्देशासाठी शासकीय जमिनी दिल्या आहेत, त्याच कामासाठी त्यांचा वापर झाला पाहिजे. शासकीय जमिनींच्या वाटपातील अटींचे उल्लंघन (शर्थभंग) होत असताना जर महसूल अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली, तर त्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई केली जाईल," असा सज्जड दम त्यांनी भरला. तसेच, मुंबईतील घर मोजणीच्या कामासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीडिसी) १० कोटी रुपयांचा निधी भूमी अभिलेख विभागाला द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

Tags
mumbaipropertyChandrashekhar Bawankuleproperty card
Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य