CSK VS LSG : पंजाबच्या पराभवानंतर चेन्नईसमोर सुवर्णसंधी, आज लखनऊविरुद्ध निर्णायक लढत

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात महत्त्वाची लढत रंगणार आहे. हा सामना लखनऊमधील अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना या हंगामातील ५९ वा सामना आहे. आयपीएल २०२६ चे साखळी सामने आता संपत आले असून अखेरचा साखळी सामना २४ मे रोजी होणार आहे. त्यामुळे अव्वल पाच संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. काल १४ मे रोजी पंजाबच्या पराभवानंतर चेन्नईसमोर मोठी संधी निर्माण झाली आहे.


या हंगामात चेन्नईने आतापर्यंत ११ पैकी सहा सामने जिंकले असून १२ गुणांसह ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नईला आजचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने ११ पैकी केवळ तीन सामने जिंकले आहेत. सहा गुणांसह लखनऊ संघ सध्या गुणतालिकेच्या तळाशी आहे, आणि प्लेऑफ शर्यतीतून बाहेर झाले आहेत.संजू सॅमसनने चेन्नईसाठी आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यांत ४३० धावा केल्या असून त्यात दोन शतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत अंशुल कंबोजने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. ११ सामन्यांत कंबोजने १९ बळी घेतले आहेत.लखनऊसाठी या हंगामात मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यांत ३७७ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत प्रिन्स यादवने चांगली कामगिरी करत ११ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत.



हेड टू हेड


आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये आतापर्यंत सात वेळा सामना झाला आहे. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन-तीन सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. विशेष म्हणजे चेन्नईने मागील दोन सामन्यांत लखनऊचा पराभव केला आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईच्या विजयाची शक्यता अधिक मानली जात आहे. मात्र चेन्नईसाठी हा करो किंवा मरो चा सामना असल्याने चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.



चेन्नईला मोठा धक्का


या सामन्यापूर्वी चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटन दुखापतीमुळे हंगामातून बाहेर झाला आहे. मांडीच्या दुखापतीमुळे तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही. विशेष म्हणजे मागील सामन्यात लखनऊविरुद्धच्या लढतीत जेमी ओव्हरटन सामनावीर ठरला होता.



कशी असेल खेळपट्टी?


चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना इकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. येथे आतापर्यंत २७ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ११ सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला १४ सामन्यांत विजय मिळाला आहे.


संभाव्य अंतिम ११ 


चेन्नई सुपर किंग्स:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, अकील हुसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, सरफराज खान.


लखनऊ सुपर जायंट्स:
मिचेल मार्श, जोस इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), एडन मार्करम, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, शहबाज अहमद, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी.

Comments
Add Comment

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक