Maharashtra : राज्यातील १८३ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर

उष्णतेची तीव्र लाट; मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा मात्र समाधानकारक


मुंबई : मे महिन्याचा पंधरवडा उलटत असतानाच राज्याला उन्हाच्या तीव्र झळांनी वेढले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी केवळ २१ तालुक्यांपुरती मर्यादित असलेली ही 'हीट वेव्ह' आता तब्बल १८३ तालुक्यांपर्यंत विस्तारली असून राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन विभागाने सादर केलेल्या आकडेवारीतून राज्यावरील या अस्मानी संकटाची भीषणता समोर आली आहे.


राज्यात ५ ते १४ मे या कालावधीत उष्णतेची लाट सातत्याने तीव्र होत असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. ११ मे रोजी १६ जिल्ह्यांतील ५१ तालुक्यांमध्ये ४५ अंश तापमानाची नोंद झाली होती, मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हा आकडा १८३ तालुक्यांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, वाढत्या उष्म्यासोबतच राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाचाही तडाखा बसला असून, वीज कोसळून १० व्यक्तींसह २७ जनावरांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील या वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण राज्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.



जलसाठा समाधानकारक, पण धोक्याची घंटा


एककीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे पाणीसाठ्याबाबत मात्र राज्याला तूर्तास दिलासा मिळाला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ३ हजार २८ धरणांमध्ये सध्या ३५ टक्के (५०३.७६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच काळात हे प्रमाण ३० टक्के इतके होते. मोठ्या, मध्यम आणि लघू अशा तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा अधिक आहे.
यंदा उन्हाची तीव्रता अधिक असली तरी 'एल निनो'च्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ही शक्यता लक्षात घेता, उपलब्ध पाणीसाठा समाधानकारक असला तरी तो जूनअखेरपर्यंत टिकवण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान