Thursday, May 14, 2026

Minister Nitesh Rane : मुंबईच्या डीएनएमध्येच हिंदुत्व, मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

Minister Nitesh Rane : मुंबईच्या डीएनएमध्येच हिंदुत्व, मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

मंत्री नितेश राणे; धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे हिंदूंची ओळख टिकली

मुंबई : "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंग्याच्या अनन्वित छळासमोर झुकण्यास नकार देऊन मृत्यू पत्करला, मात्र धर्म सोडला नाही. त्यांच्या याच सर्वोच्च बलिदानामुळे आज आपण ताठ मानेने 'हिंदू' म्हणून उभे आहोत. मुंबईच्या तर डीएनएमध्येच हिंदुत्व आहे," असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी येथे केले.

सकल हिंदू समाज (सहार भाग) यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी परिसरात आयोजित भव्य शोभायात्रा व बाईक रॅलीमध्ये ते बोलत होते. मरोळ पाईपलाईन येथून निघालेल्या या रॅलीदरम्यान राणे यांनी 'हिंदुत्वा'च्या मुद्द्यावरून हिरव्या पिलावळीवर जोरदार निशाणा साधला. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राणे म्हणाले की, शंभूराजांनी इस्लाम स्वीकारला असता तर आज हिंदूंची ओळख पुसली गेली असती. औरंग्याने त्यांच्या शरीराचा असा एकही भाग सोडला नाही जिथे छळ केला नसेल. पण राजांच्या मनात धर्माभिमान कायम होता. शंभूराजांच्या बलिदानाप्रमाणे कडवट हिंदुत्व प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले, तर समाजात 'हिरवे साप' वळवळणार नाहीत," असेही त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानात 'आय लव्ह महादेव'च चालणार!

मंत्री नितेश राणे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत, असे सांगताच काहींच्या पोटात दुखते. पण ही हिंदूंची भूमी आहे आणि इथे फक्त हिंदूंचेच हित पाहिले जाईल. महाराष्ट्रात, मुंबईत राहायचे असेल तर 'आय लव्ह मोहम्मद' चालणार नाही, इथे फक्त 'आय लव्ह महादेव'च चालणार," असा इशारा त्यांनी दिला.

'देवभाऊंचे सरकार तुमच्या पाठीशी'

महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून हिंदूंच्या केसालाही धक्का लागल्यास शासन सहन करणार नाही. जेव्हा जेव्हा हिंदूंवर 'हिरवे संकट' येईल, तेव्हा तेव्हा एकजुटीने प्रतिकार करा. देवभाऊंचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती वर्षाचे ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. मरोळ, विजय नगर, एमआयडीसी ते मेघवाडी आणि मालपा डोंगरी अशा विविध भागांतून निघालेल्या या रॅलीत हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते.

Comments
Add Comment