Nashik Simhastha : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण , तुम्ही कुंभमेळ्याचे बोधचिन्ह पाहिले का ?

Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले.



नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते.



भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह आहे.


 

 



त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख 

ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात

त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख

पहिले अमृतस्नान -2-08-2027

द्वितीय अमृतस्नान – 31-08- 2027

तृतीय अमृतस्नान – 12- 09-2027

नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख

31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात

पहिले अमृतस्नान -2-08-2027

द्वितीय अमृतस्नान – 31-08- 2027

तृतीय अमृतस्नान – 11- 09-2027

 

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा


सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे दर बारा वर्षांनी घडणारा, हिंदू धर्मीयांचा मेळा आहे. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरतो. अशाच प्रकारचे कुंभमेळे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन येथेही भरतात.


आख्यायिका
समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना वाटले की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो, अशी आख्यायिका आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : गणेश मिरवणुकीवर अंडी फेकणारे जिहादी महाराष्ट्रात हवेच कशाला; मंत्री नितेश राणे यांचा संतप्त सवाल

भाईचाऱ्याच्या बाता मारणारे आता कुठल्या बिळात लपलेत? https://prahaar.in/2026/08/24/heated-exchange-in-the-supreme-court-over-the-surrender-certificate-what-did-the-court-say/ मुंबई :

CM Devendra Fadnavis : महिला आरक्षणाच्या मुद्यावरून एक्सवर मुख्यमंत्री आणि चिदंबरम यांच्यात शाब्दिक चकमक

मुंबई : संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात महिलांच्या अधिकारांवर बोलतात. पण ते आणि त्यांचा काँग्रेस

Tarun Tejpal case : सर्वोच्च न्यायालयात आत्मसमर्पण प्रमाणपत्रावरून खडाजंगी; न्यायालयाने काय म्हटले?

New Delhi : 'तेहलका' मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्याशी संबंधित २०१३ च्या बहुचर्चित बलात्कार प्रकरणाची

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन, पोलिसांच्या निवासाची व्यवस्था कार्यक्षेत्राजवळ करण्यावर भर

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या

Unrest in Pakistan : बलुचिस्ताननंतर आता ‘सिंधुदेश’च्या मागणीने जोर पकडल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात आणि सुरक्षेत सध्या मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK)

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीमध्ये पावसाचा व्यत्यय, भारताने उभारला धावांचा डोंगर; ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर

https://prahaar.in/2026/08/24/if-i-get-a-chance-i-will-contest-elections-olympic-medalist-saina-nehwal-said/ श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात मुसळधार