Supreme Court : ....तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय

Supreme Court : जातीय शिवीगाळ प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची नेमकी मर्यादा काय आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयातून महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. कौटुंबिक वाद, घराच्या आत घडलेली घटना आणि त्यानंतर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा या पार्श्वभूमीवर न्यायालयाने काही महत्त्वाचे निकष स्पष्ट केले आहेत. न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.एखाद्या खासगी घराच्या चार भिंतींच्या आत, इतर कोणीही उपस्थित नसताना झालेली कथित जातिवाचक शिवीगाळ किंवा अपमान हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. (Supreme Court makes an important decision)




तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरणार नाही

न्यायालयाने स्पष्ट केले की, अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३(१)(र) आणि ३(१)(स) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी जातिवाचक अपमान किंवा शिवीगाळ ही लोकांच्या नजरेसमोर” घडलेली असणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या मते, जर एखादी घटना सार्वजनिक ठिकाणी घडली असेल आणि उपस्थित लोक आरोपीने वापरलेले अपमानास्पद शब्द प्रत्यक्ष ऐकू किंवा पाहू शकत असतील, तरच त्या घटनेला कायद्याअंतर्गत गुन्हा मानले जाऊ शकते.



मात्र, जर कथित घटना एखाद्या खासगी घराच्या आत घडली आणि त्या ठिकाणी अन्य कोणीही उपस्थित नसेल, तर ती घटना “लोकांच्या नजरेसमोर” घडली असे मानता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. खासगी जागाही काही परिस्थितीत सार्वजनिक मानली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. एखादी घटना खासगी ठिकाणी घडली असली, तरी ती इतर लोकांना प्रत्यक्ष दिसू किंवा ऐकू येत असेल, तर त्या ठिकाणाला “लोकांच्या नजरेसमोर” असल्याचे मानले जाऊ शकते. यामुळे प्रत्येक प्रकरणातील परिस्थितीनुसार न्यायालयाला तथ्यांची तपासणी करावी लागेल, असेही स्पष्ट झाले आहे.

Comments

Mrs.Surekha Bhujbal    May 14, 2026 01:28 PM

पती पत्नी मधील वाद लोकांना जरी ऐकू येत असले तरी पती-पत्नीच्या वक्तव्याचा लोकांनी अनर्थ काढू नये.

Add Comment

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या