RCB VS KKR : आज आयपीएलमध्ये कोलकाता विरुद्ध आरसीबी आमने सामने ,कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज...

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज ५७ वा सामना रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात होणार आहे. हा सामना दोघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आरसीबीने आतापर्यंत ११ पैकी ७ सामने जिंकले आहे. ते १४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. प्लेऑफला पात्र होण्यासाठी आरसीबीला एक सामना जिंकायचा आहे. कोलकाताने या हंगामाची सुरुवात खराब केली होती. मात्र हळुहळू संघाने लय पकडली आहे. संघाने आतापर्यंत १० पैकी चार सामने जिंकले आहेत. केकेआर सलग चार सामन्यात अपराजीत आहे. केकेआर गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना उर्वरित चार सामने जिंकावे लागतील.


या हंगामात आरसीबीसाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ३७९ धावा केल्या आहेत. मात्र आरसीबीसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे रजत पाटीदारचा फॉर्म. गेल्या सहा सामन्यात रजत काही खास कामगिरी करू शकला नाही आहे. मागील सहा सामन्यात त्याने फक्त एक अर्धशतक मारले आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आहेत. केकेआरसाठी अंगीकृश  रघुवंशीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ९ सामन्यात २६९ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कार्तिक त्यागीने ९ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात तो केकेआरसाठी सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे .



हेड टु हेड


आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी आणि केकेआर या दोघांमध्ये ३५ सामने झाले आहेत. आज ३६ व्यांदा यांचा आमना सामना होणार आहे. आतापर्यंत झालेल्या ३५ पैकी केकेआरने २० सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत . गेल्या हंगामात आरसीबने केकेआरचा पराभव केला होता . २०२६ च्या हंगामात या दोंघामध्येही पहिलीच लढत आहे.


पिच रिपोर्ट


रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी संतुलित आहे. सुरुवातीला चांगल्या उसळीमुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरते, पण नंतर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते . ही खेळपट्टी अवघड असली तरी, एकदा टिकून राहिल्यावर, फलंदाजीसाठी एक चांगली आणि अनुकूल खेळपट्टी मानली जाते. सीमारेषा दूर असल्यामुळे रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणे कठीण जाते. यामुळे या पिचवर अचूक फटकेबाजी करणे आवश्यक आहे.येथे आयपीएलमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७२ आहे.

Comments
Add Comment

BWF World Championship : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक

नवी दिल्ली : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला जोडीला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)