Navnath Ban : पंतप्रधानांना सल्ले देण्यापेक्षा आधी पक्षाच्या इंजिनाची दिशा बघा

नवनाथ बन यांची राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर पोटात दुखू लागलेल्या राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना सल्ले देणे सुरु केले आहे. राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या ध्येय-धोरणांसाठी आणि पक्षवाढीसाठी एव्हढे मोठे ट्वीट लिहिले असते तर त्याचा अधिक फायदा झाला असता. मात्र आपल्या पक्षाच्या वाताहतीकडे पहायाला ते तयार नाहीत, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्यानेच जनतेने त्यांना तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून दिल्याचे सांगत श्री. बन म्हणाले की पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शरद पवार या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे म्हणत आहेत. पवारसाहेब, जेव्हा इंदिरा गांधी यांनी सोने खरेदी करू नका असे आवाहन केले होते, तेव्हा कुणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती? तुमचे यूपीए सरकार होते आणि तुम्ही कृषीमंत्री होता, तेव्हा महाराष्ट्रात रोज शेकडो शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा तुम्हाला अस्वस्थता जाणवली नव्हती का? तेव्हा त्याबद्दल तुम्ही पावले टाकली होती का?



जेव्हा काँग्रेसचे, यूपीएचे सरकार होते तेव्हा पेट्रोल आणि डिझेल पंप रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत बंद असत, तेव्हा कुठे गेली होती तुमची अस्वस्थता? यूपीएच्या कार्यकाळात टू जी आणि थ्री जी स्कॅम झाले होते आणि मोठ्या प्रमाणात इतरही घोटाळे झाले होते, तेव्हा तुम्ही अस्वस्थतेबद्दल चकार शब्दही बोलले नव्हते, याकडे श्री. बन यांनी लक्ष वेधले.


रोहित पवार यांनी एसआयआर, निवडणूक आयोगावर टीका करण्याचे धंदे बंद केले पाहिजेत, असे सुनावत श्री. बन म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये एसआयआरमुळे भाजपाचा विजय झाला नाही, तर ममता दीदींची दहशत संपवण्याचे काम पश्चिम बंगालच्या जनतेने केले आहे. ''एसआयआर''मध्ये सर्वाधिक नावे ज्या दहा मतदारसंघांमध्ये वगळली गेली, त्या दहापैकी आठ ठिकाणी टीएमसीचा विजय झाला आहे.
रोहित पवारांनी आधी आपल्या मतदारसंघात, आपल्या पक्षात काय चाललेय ते पहावे आणि नंतर निवडणूक आयोग आणि इतर बाबींवर टीका-टिप्पणी करावी. खरे तर त्यांना वाटते की आपण लवकरच राज्याचे, देशाचे नेतृत्व करावे; परंतु त्यासाठी अजून वेळ आहे, अशा शब्दात श्री. बन यांनी रोहित पवार यांना फटकारले.

Comments
Add Comment

Nashik Crime : नाशिकरोड-उपनगर हद्दीतील गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात

Nashik Crime : नाशिकरोड (Nashik Road Police Station) आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास

Buldhana Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकची समोरील वाहनाला धडक; चालकाचा जागीच मृत्यू, क्लिनर जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरुच असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास आणखी एक भीषण अपघाताची

Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग ! नाशिकरोड स्थानकावर २४ बोगी गाड्या प्लॅटफॉर्म एकवर लागणार

Simhastha Kumbh Mela 2027 : आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरु आहे. कुंभमेळ्याच्या