Nashik Crime : नाशिकरोड-उपनगर हद्दीतील गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात

Nashik Crime : नाशिकरोड (Nashik Road Police Station) आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी आणि आकाश दीपक गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघा संशयितांकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली स्कोडा कार (एमएच ३९ जे ३१४७) जप्त करण्यात आली आहे. (Nashik Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ स्वप्नील गोसावी आणि साथीदारांनी फिर्यादीला पिस्तूलाचा धाक दाखवून १७ हजार रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station)  २९ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ३० जुलै रोजी मध्यरात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Upnagar Police Station) जाधव मळा येथे आरोपींनी एका इमारतीच्या पार्किंगमध्ये जाऊन मर्सिडीज कारची तोडफोड केली. विरोध करण्यासाठी आलेल्या फिर्यादीवर स्वप्नील गोसावीने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. (Nashik Crime News)



 गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात


या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत संशयितांचा (Suspected) शोध घेताना पोलिसांनी अहिल्यानगर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, संगमनेर, राजूर, अकोले, लोणी आणि कोल्हार परिसरात तपास केला. कोल्हार येथून आरोपी राहुरी साखर कारखान्याकडे स्कोडा कारने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून भरधाव कार अडवली आणि दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीत संशयितांकडून १ लाख रुपये किमतीचा गावठी कट्टा, ४ हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे आणि १० लाख रुपये किमतीची स्कोडा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे