Sunil Tatkare : मुख्यमंत्री पदाबाबत सुनील तटकरेंनी जय पवारांना आणले भानावर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जय पवार यांच्या 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात' या विधानावर भाष्य करताना त्यांना राजकीय वास्तवाचे भान राखण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. "प्रत्येकाच्या मनात अनेक इच्छा असतात, मात्र राजकीय वास्तव लक्षात घेऊनच आम्हाला पक्ष म्हणून वाटचाल करावी लागते," अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.



दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. "अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी बारामतीकरांची इच्छा होतीच, पण आता सुनेत्रा वहिनी त्यासाठी कष्ट घेत आहेत. २०२९ मध्ये त्या बारामतीतून निवडणूक लढवतील आणि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे," असे जय पवार म्हणाले होते.


जय पवारांच्या विधानावर पत्रकारांनी विचारले असता सुनील तटकरे म्हणाले, "एखादे नेतृत्व मोठे व्हावे असे कार्यकर्त्याला किंवा कुटुंबातील व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे. जय पवार यांनीही त्याच भावनेतून ते विधान केले असावे. मात्र, राजकारणात केवळ इच्छा असून चालत नाही, तर राजकीय वास्तव स्वीकारावे लागते. आमचा पक्ष एनडीएचा घटक आहे आणि आम्ही त्याच चौकटीत राहून पुढील वाटचाल करत आहोत", असे त्यांनी स्पष्ट केले.



रोहित पवारांचीही वादात उडी


दरम्यान, या वादात आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. जय पवारांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार जय पवारांना सल्ला देताना म्हणाले की, आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती. अजित दादा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि रस्त्यावरची लढाई लढून 2029 मध्ये आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी दादांची इच्छा होती. मात्र, आजच्या परिस्थितीत भाजपसोबत राहून दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. जर कुणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर भाजपला प्रखर विरोध करावाच लागेल. अजितदादांच्या गेल्या चार महिन्यांतील विधानांवरून ते भाजपला विरोध करत असल्याचेच दिसत होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी ठेवावी." असे रोहित पवार म्हणाले.

Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या