BCCI ACTION: आयपीएल २०२६ (Indian Premier League 2026) मध्ये वादांची मालिका सुरूच असून आता आरसीबी (Royal Challengers Bengaluru) चे हेड कोच अँडी फ्लॉवर (Andy Flower) यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या थरारक सामन्यात चौथ्या पंचांसोबत झालेल्या वादानंतर फ्लॉवर यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे.
🚨FINED🚨
RCB head coach Andy Flower has been fined 15% of his match fee after breaching article 2.3 of the IPL’s Code of Conduct. The incident occurred in the 18th over when Flower spoke aggressively with the fourth umpire.#IPL2026 pic.twitter.com/TcnIYFLTHe — Cricbuzz (@cricbuzz) May 11, 2026
नेमकं प्रकरण काय ?
रायपूर येथे झालेल्या या सामन्यात आरसीबीने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. मात्र सामन्याच्या दुसऱ्या डावातील १७ व्या षटकात घडलेल्या एका निर्णयामुळे वातावरण चांगलेच तापले. मुंबईचा गोलंदाज अल्लाह गझनफर (Allah Ghazanfar) गोलंदाजी करत असताना आरसीबीचा फलंदाज कृणाल पांड्या (Krunal Pandya) याने लेग साईडकडे फटका मारला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या नमन धीर (Naman Dhir) याने उत्कृष्ट प्रयत्न करत चेंडू अडवला आणि पुन्हा मैदानात फेकला. मात्र रिप्ले पाहिल्यानंतरही मैदानावरील पंचांनी तो प्रयत्न वैध असल्याचे सांगत आरसीबीला अतिरिक्त धावा दिल्या नाहीत. आरसीबीच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला मात्र नमन धीरचा पाय सीमारेषेला लागल्याचा संशय होता. यानंतर मैदानावर मोठा गोंधळ निर्माण झाला.
चेन्नई: आयपीएल २०२६ मध्ये रविवारी झालेल्या Chennai Super Kings आणि Lucknow Super Giants यांच्यातील सामन्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी Rajasthan Royals संघावर ...
आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि हेड कोच अँडी फ्लॉवर यांनी चौथ्या पंचांकडे धाव घेत निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही मिनिटे पंच आणि आरसीबी व्यवस्थापनामध्ये चर्चा सुरू होती. याच दरम्यान फ्लॉवर यांनी संतापाच्या भरात पंचांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला.या घटनेची गंभीर दखल घेत बीसीसीआयने आयपीएल आचारसंहितेअंतर्गत अँडी फ्लॉवर यांच्यावर कारवाई केली. सामन्यादरम्यान शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांना त्यांच्या मॅच फीच्या १५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. काही चाहत्यांनी आरसीबीच्या नाराजीला योग्य ठरवले, तर काहींनी पंचांच्या निर्णयाचा आदर राखण्याची गरज असल्याचे म्हटले. आयपीएल २०२६ मध्ये याआधीही पंचांच्या निर्णयांवरून अनेक वाद निर्माण झाले असून आता या नव्या घटनेमुळे स्पर्धेतील तणाव आणखी वाढल्याचे दिसत आहे.





