PBKS VS DC: आज आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध पंजाब आमने सामने , पंजाब पुनरागमनासाठी सज्ज ....

धर्माशाळा : आयपीएल २०२६ मध्ये आज ५४ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मध्ये होणार आहे. हा सामना पंजाबच्या धर्माशाला स्टेडियमवर होणार आहे. सलग तीन पराभवानंतर पंजाब पुनरागमनासाठी सज्ज आहे , तर दिल्ली प्लेऑफच्या रेसमध्ये टिकुन राहण्यासाठी खेळेल.


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने २०२६ च्या हंगामाची सुरुवात धमाकेदार केली होती. पंजाब सलग सात सामन्यात अपराजीत होती, मात्र मागील तीन सामन्यात पंजाबला पराभाव पत्करावे लागले आहे. आता पर्यंत पंजाबने १० मध्ये ६ सामने जिंकले आहेत आणि तीन सामन्यात त्यांचा पराभाव झाला आहे ,तर एक सामना पाऊसमुळे वाया गेला आहे. १३ गुणांसह पंजाब गणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्ली ११ सामन्यात फक्त चार सामने जिंकू शकली आहे. ८ गुणांसह दिल्ली आठव्या स्थानावर आहे. दिल्लीने हा सामना गमवला तर आयपीएल २०२६ मध्ये अधिकृतपणे त्यांचे प्लेऑफचे आव्हान संपुष्टात येईल.


या हंगामात पंजाबसाठी पदार्पण करणाऱ्या कूपर कॉनोली याने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १० सामन्यात ३७७ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतके आणि एका शतकाचाही समावेश आहे. पंजाबची गोलंदाजी यंदाच्या वर्षी अपेक्षीत प्रमाणे कामगिरी करु शकली नाही , मात्र अर्शदीप सिंहने १० सामन्यात सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या आहेत. केएल राहुलने दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ४६८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत अक्षर पटेलने ११ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.



हेड टु हेड
आयपीएल इतिहासात या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३५ सामने झाले आहेत. यात पंजाबने १९ सामने जिंकले आहेत ,तर दिल्लीने १६ सामन्यात पंजाबचा पराभव केला आहे. मात्र मागील तीनही सामन्यात पंजाबने दिल्लीला हरवले आहे.




कशी असे खेळट्टी ?


पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना धर्माशाळा मैदानावर होणार आहे. या मैदानावर मोठी धावसंख्या होण्यची शक्यता आहे, तसेच वेगवान गोलंदाजांनाही मद्दत मिळू शकते. याआधी इथे आयपीएलचे १४ सामने झाले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला ९ वेळा विजय मिळवता आले आहे ,तर पाच वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळाला आहे. यामुळे नाणेफेक निर्णायक ठरु शकते.


दोन्ही संघांचे संभाव्य-12


पंजाब किंग्स: प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टोयनिस, अजमतुल्लाह उमरजई, शशांक सिंह, मार्को यानसन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल आणि विजयकुमार वैशाख.


दिल्ली कॅपिटल्स: पथुम निसंका, केएल राहुल, नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, लुंगी एनगिडी आणि मुकेश कुमार.






Comments
Add Comment

BWF World Championship : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक

नवी दिल्ली : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला जोडीला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)