Oath Ceremony : हिमंता सरमा आसामचे, रंगास्वामी पुदुच्चेरीचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, शपथविधीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये शनिवार नऊ मे रोजी भाजपने सरकार स्थापन केले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. तर आज म्हणजेच रविवार १० मे रोजी तामिळनाडूत टीव्हीके पक्षाचे सर्वोच्च नेते थलपती विजय उर्फ चंद्रशेखरन जोसेफ विजय यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. आता मंगळवार १२ मे रोजी आसाम आणि १३ मे रोजी पुदुच्चेरीत शपथविधी होणार आहे.



आसाममध्ये भाजपने हॅटट्रिक केली आहे. भाजपच्या नेतृत्वात पहिल्यांदा आसाममध्ये सत्ता स्थापन झाली त्यावेळी सर्बानंद सोनोवाल यांनी सरकारचे नेतृत्व केले. यानंतर भाजपच्या दुसर्‍या कार्यकाळात (टर्म) हिमंता बिस्वा सरमा यांनी सरकारचे नेतृत्व केले. आता सलग दुसऱ्यांदा ते आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सरमा सरकारचा शपथविधी मंगळवार १२ मे रोजी होणार आहे.



पुदुच्चेरीत एनडीएचीच सत्ता सलग दुसऱ्यांदा आली आहे. एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भाजपची युती पुन्हा सत्तेत आली आहे. रंगास्वामी १३ मे रोजी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.



केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष हा गंभीर प्रश्न सोडवण्यात गुंतला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी केरळमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी ठोस हालचाल झालेली नाही. मागील पाच वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून यूडीएफचे नेतृत्व करणाऱ्या व्ही. डी. सतीशन यांच्याकडे काही आमदारांचा पाठिंबा आहे. के. सी. वेणुगोपाल हे एआयसीसी सरचिटणीस आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय आहेत, त्यांनाही काही आमदारांचा पाठिंबा आहे. तर रमेश चेन्निथला हे माजी विरोधी पक्षनेते आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या नावालाही निवडक आमदारांचा पाठिंबा आहे. यामुळे केरळमध्ये व्ही. डी. सतीशन, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार यावरून चर्चेला उधाण आहे.



विधानसभा निवडणूक निकाल २०२६


पुदुच्चेरी - एकूण जागा ३०


एआयएनआरसी १२


द्रमुक ५


भाजप ४


टीव्हीके २


काँग्रेस १


एलजेके १


अण्णाद्रमुक १


एनवायएमके १


अपक्ष ३


आसाम - एकूण जागा १२६


भाजप ८२


काँग्रेस १९


बीओपीएफ १०


एजीपी १०


एआययूडीएफ २


आरजेआरडी २


तृणमूल काँग्रेस १


केरळ - एकूण जागा १४०


काँग्रेस ६३


सीपीआय एम २६


आययूएमएल २२


सीपीआय ८


केईसी ७


आरएसपी ३


भाजप ३


आरजेडी १


आरएमपीओआय १


केरळ काँग्रेस जेकब १


कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष केरळ राज्य समिती १


अपक्ष १


तामिळनाडू - एकूण जागा २३४


टीव्हीके १०८


द्रमुक ५९


अण्णाद्रमुक ४७


काँग्रेस ५


पीएमके ४


आययूएमएल २


सीपीआय २


व्हीसीके २


सीपीआय(एम) २


भाजप १


डीएमडीके १


अम्मा मक्कल मुनेत्र कझागम १


पश्चिम बंगाल - एकूण जागा २९४ पैकी २९३ जागांचे निकाल जाहीर


भाजप २०७


तृणमूल काँग्रेस ८०


काँग्रेस २


आम जनता उन्नयन पार्टी २


सीपीआय(एम) १


एआयएसएफ १

Comments
Add Comment

Mumbai News: समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवण्याची अमित साटम यांची मागणी; महापौर आणि आयुक्तांना पत्र

मुंबई : मुंबईतील (Mumbai) समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात वाहून येणारा कचरा रोखण्यासाठी समुद्रात मिळणाऱ्या सर्व नाले

Mumbai-Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प; प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली, अतिरिक्त शिवनेरी बसेस सुरू

मुंबई : लोणावळा-कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या

'Dhamaal 4' Movie : 'धमाल 4'चा बॉक्स ऑफिसवर धडाका; विकेंडला ६० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर 'धमाल 4' (Dhamaal 4) बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट (Hit) ठरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. दुसऱ्या

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

FIFA World Cup 2026 : स्वित्झर्लंडचा धूव्वा उडवत अर्जेंटिनाने केला सहाव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश; शेवटच्या क्षणी फिरला सामना !

मिसूरी: अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज (१२ जुलै) पार पडला. या सामन्यात

India-New Zealand Free Trade Agreement : भारत-न्यूझीलंड संबंधांना नवी दिशा; व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य, ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ करारावर शिक्कामोर्तब

ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंडने द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन्ही