Thalapathy Vijay : तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय रविवारी सकाळी शपथ घेणार

चेन्नई : तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय उर्फ चंद्रशेखरन जोसेफ विजय रविवारी सकाळी दहा वाजता शपथ घेणार आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजयला सत्ता स्थापनेची संधी दिली आहे. राज्यपालांनी विजयला बुधवार १३ मे २०२६ पर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.



याआधी संध्याकाळी थलपती विजयने राज्यपालांना भेटून १२१ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला. सत्तेसाठी थलपती विजयच्या टीव्हीके या पक्षाने एकूण पाच पक्षांचा पाठिंबा मिळवला आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या १२१ च्या घरात पोहोचली आहे. टीव्हीकेला काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. टीव्हीकेचे १०८ आमदार निवडून आले आहेत. पण विजय दोन मतदारसंघात विजयी झाला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत तो एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देईल आणि तिथे पोटनिवडणूक होईल. अद्याप हा राजीनामा आलेला नसल्यामुळे कागदोपत्री टीव्हीकेचे १०८, काँग्रेसचे ५ तर सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांचे प्रत्येकी दोन असे एकूण १२१ आमदार आहेत. यामुळे २३४ आमदारांच्या तामिळनाडू विधानसभेत विजयकडे बहुमत असल्याचे दिसत आहे.



तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी २३४ आमदारांच्या विधानसभेत ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. विजयकडे यापेक्षा जास्त आमदार आहेत. विजयने दोन पैकी एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला तर पोटनिवडणुकीचा निकाल येऊन नव्या आमदाराने शपथ घेईपर्यंत सभागृहाची सदस्य संख्या २३३ असेल आणि बहुमताचा जादुई आकडा (मॅजिक फिगर) ११७ असेल.



विजयने पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी मिळावी अशा स्वरुपाचे पत्र दिले नव्हते. त्याने स्वतःच्या १०८ आमदारांसह काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे ११२ जणांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले होते. यामुळेच राज्यपालांनी विजयला बहुमत घेऊन ये आणि सत्ता स्थापनेचा दावा कर अशी सूचना केली. आता विजयने १२१ आमदारांची जुळवाजुळव झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.


पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. पुदुच्चेरीत एनडीएचीच सत्ता सलग दुसऱ्यांदा आली आहे. एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भाजपची युती पुन्हा सत्तेत आली आहे. रंगास्वामी १३ मे रोजी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. तर आसाममध्ये भाजपने हॅटट्रिक केली आहे. पुढील एक दोन दिवसांत आसाम सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पण केरळमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष हा गंभीर प्रश्न सोडवण्यात गुंतला आहे.

Comments
Add Comment

Ahilyangar Crime : ‘पैसे अन् सोनं सिद्ध करून देतो’ म्हणत महिलेची 45 हजारांची फसवणूक, भोंदू साधू गजाआड

Ahilyangar Crime : ‘पैसे आणि सोन्याची अंगठी सिद्ध करून देतो’, असा बहाणा करत महिला व्यापाऱ्याची तब्बल 45 हजार रुपयांची फसवणूक

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला ग्रहणाचा सावट नाही, पण सकाळचा मुहूर्त चुकला ? जाणून घ्या दुपारी राखी कधी बांधायची!

आज २८ ऑगस्ट रोजी देशभरात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा 'रक्षाबंधन' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला

Ahilyanagar News : शाळा सुटली अन् काळ बनून कार आली, सहा विद्यार्थ्यांना चिरडलं, दोघे गंभीर

Ahilyanagar News : शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Nashik Crime News : गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून वाद टोकाला ! सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या

Nashik Crime News : गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या जुन्या वादातून हेमंत सूर्यवंशी (२९, रा. होळी चौक, सुरगाणा) या