Pramod Jathar : कोकणात भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे

रत्नागिरी : भविष्यात संपूर्ण कोकणात भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक बळकट व भक्कम करण्याचा निर्धार पक्षाने केला असून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पक्षासाठी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी राजापूर येथे केले. आपल्याला मिळालेली विधानपरिषदेची आमदारकी हा वैयक्तिक सन्मान नसून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समर्पित असल्याचेही त्यांनी सांगितले.जठार रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून राजापूरपासून त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. राजापुरात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. शहरात आगमन होताच त्यांनी जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही त्यांनी पुष्पहार अर्पण केला.


केंद्रात आणि राज्यात भाजपा महायुतीची सत्ता असून या सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी काम करत पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. सरकार युतीचे असते, निवडणुका युतीत लढवल्या जातात; मात्र पक्ष वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात कोकणात “शतप्रतिशत भाजपा” हाच पक्षाचा अजेंडा असल्याचेही त्यांनी नमूद केले.



“नवा-जुना” असा वाद न करता एकदिलाने पक्षासाठी काम करा. पक्ष कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेत असतो. आज राजापिरातच नव्हे तर रत्नागिरीतही भाजपाची सत्ता नाही; मात्र भविष्यात ती निश्चित येईल आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पदे येतात-जातात, एकाला संधी देताना अनेकजण नाराज होतात; मात्र पक्षाचे ध्येय ‘राष्ट्र प्रथम’ हेच असल्याने त्यानुसार कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.


यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲड. विलास पाटणे, कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस व उपसभापती अभिजित गुरव, ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, नगरसेविका सुयोगा जठार, महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, शहराध्यक्ष किरण शिवलकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण