Ashok Kharat Case: 'तो' एक प्रश्न विचारताच अशोक खरात चिडला

Ashok Kharat Case: नाशिकमधील बहुचर्चित प्रकरणातील अशोक खरात याच्या पोलीस कोठडीतील वाऱ्या गेल्या दिवसांपासून सुरु आहे. महिलांचे लैंगिक शोषण , आर्थिक फसवणूक , जादूटोणा अशा काही प्रकरणांत त्याच्या जेल वाऱ्या सुरु आहेत. दरम्यान, शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक व्यवहार व अवैध सावकारकी प्रकरणात भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडीत आहे. खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज दुपारी त्याला पुन्हा एकदा राहाता दिवाणी न्यायालयात हजर केल जाईल. (Ashok Kharat Nashik )


गेल्या चार दिवसांपासून शिर्डी पोलिसांकडून भोंदू अशोक खराची चौकशी सुरु आहे. विविध कागदपत्र आर्थिक व्यवहार या संदर्भात चौकशीत अशोक खरात पूर्णपणे सहकार्य करत नसल्याचे समोर येत आहे. शिर्डी पोलिसांनी सदर प्रकरणातील साक्षीदारांची समोरासमोर चौकशी करुन प्रश्न विचारल्यानंतर अशोक खरात चिडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मी कायदेशीर व्यवहार केला असून साक्षीदार मला मुद्दाम अडकवत असल्याचा आरोप त्याने केला.


चौकशी सुरू असताना भोंदू अशोक खरात आपला संयम हरवून बसला. त्याने स्वतःचा गुन्हा मान्य करण्याऐवजी उलट साक्षीदारांवरच संताप व्यक्त केला. "तुमच्यामुळेच मी या वादात आणि पोलीस चौकशीत अडकलो आहे," असा सूर लावत त्याने सर्व खापर साक्षीदारांवर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सगळं करताना गेल्या चार दिवसात कल्पना खरात कुठे आहे. याबाबत मात्र त्याने मौन बाळगलं. शिर्डी पोलीस त्याला आज दुपारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. (Ashok Kharat Nashik )



कल्पना खरात अद्यापही फरार


अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) जमीन खरेदी फसवणूक व अवैध सावकारी गुन्ह्यात तपासाला वेग दिला आहे. मात्र अशोक खरात अर्धवट माहिती पोलिसांना देत असून कल्पना खरातबाबत त्याने पूर्णपणे मौन बाळगले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसआयटी पथकाने नाशिक प्रकरणातील निदा खानाला महिनाभरात ताब्यात घेतले असले तरी गेल्या 40 दिवसांपासून फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध लावण्यात पोलिसांना अजूनही अपयश येत आहे.



अशोक खरातच्या अडचणीत वाढ होणार


अशोक खरात विरोधात पुढील आठवड्यात दोषारोपपत्र सादर होण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल होणार आहे. अशोक खरात विरोधातील महिला अत्याचार प्रकरणाच्या 8 आणि फसवणुकीचा 1 असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. अशोक खरातच्या अटकेनंतर 60 दिवसाच्या आता दोषारोपपत्र दाखल करण्याचा एसआयटीचा प्रयत्न आहे. आतापर्यंत करण्यात आलेला तापस, गोळा करण्यात आलेले पुरावे आणि नोंदविण्यात आलेल्या जबाबच्या आधारावर दोषारोपपत्र दाखल होणार आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान