Nashik TCS Case : एमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाने निदा खानला लपवून ठेवले , धक्कादायक माहिती समोर

Nashik TCS Case : नाशिकमधील टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला अखेर अटक करण्यात आली आहे. निदा खान (Nida Khan) हिच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे पुरावे समोर येतील अशी शक्यता व्यक्त होत असतानाच आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खान ही गेल्या ४० दिवसांपासून फरार होती. 40 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.


निदा खान नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात


मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानचा मुक्काम होता. (Nida Khan Arrested)



दोन दिवस पोलिसांकडून इमारतीवर पाळत


निदा खान कौसर पार्क येथील मतीन पटेल यांच्या मालकीच्या घरात लपली असल्याची कुणकुण नाशिक पोलिसांना (Nashik Police) लागली. नाशिक पोलिसांनी तातडीने ही माहिती संभाजीनगर पोलिसांना (Sambhajinagar Police) कळवली. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखा (Nashik Crime Branch) आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सलग दोन दिवस या इमारतीवर पाळत ठेवली. तांत्रिक तपासात खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेण्यात आले.


निदा खानचा जामीन फेटाळला


निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते, मात्र न्यायालयाने हे प्रकरण 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'शी संबंधित असल्याचे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तिचा जामीन फेटाळला. निदाच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परकीय निधी (Funding) आणि धर्मांतराचे जाळे याबाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहेत. (Nida Khan Arrested)



दोन आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार


दरम्यान, नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


एमआयएम हा अतिरेकी पक्ष : नितेश राणे


नितेश राणे यांनी या प्रकरणावर म्हटले आहे की, 2047 पर्यंत या राज्याला गजवा-ए-हिंदच्या अंतर्गत इस्लाम राष्ट्र बनवणे हे या लोकांचे मनसुबे आहेत. एमआयएम हा अतिरेकी पक्ष आहे. या पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मागची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. इम्तियाज जलील हे निदा खानची बाजू घेत होते. इम्तियाज जलील यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.