Minister Sanjay Shirsat : एमआयएम 'कॉर्पोरेट जिहाद'चे मास्टरमाइंड, मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

मुंबई : राज्यातील सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या 'कॉर्पोरेट जिहाद' (Corporate Jihad) प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाइंड एमआयएमचे (MIM) नेते असून, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांची याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी, असा खळबळजनक आरोप मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat) यांनी शुक्रवारी केला. निदा खानसारखे लोक केवळ मोहरे असून, यामागे मोठे षड्यंत्र असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


संजय शिरसाट माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "धर्मांतर करणे आणि हिंदू मुलींना फसवणे हे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. निदा खान ही केवळ एक मोहरा आहे, मात्र तिचे जाळे नगर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे. हिंदूंचा द्वेष करणे आणि समाजात विष पसरवणे यामुळे लोकांमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे. कालच्या प्रकरणातही हेच दिसून आले. आता निदा खानला (Nida Khan) अटक झाली असून, यामागील खरे सूत्रधार समोर येणे आवश्यक आहे."


नाशिकमधील (Nashik) कॉर्पोरेट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना शिरसाट यांनी आर्थिक स्रोतांवर बोट ठेवले. "ज्या मुलांकडे कोणताही कामधंदा नाही, त्यांच्याकडे दीड-दीड लाखांच्या महागड्या दुचाकी आणि आयफोन कसे येतात? खिशात पैसे कुठून येतात? वयात आलेल्या मुलांना 'ट्रेन' करण्याचे काम सुरू आहे. यामाध्यमातून महिलांवर बलात्काराचे प्रयत्न, धर्मांतर आणि नशेखोरीला खतपाणी घातले जात आहे. पोलीस यंत्रणेने या पैशांच्या व्यवहारांचा आणि आर्थिक स्रोतांचा तातडीने तपास केला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.




'मास्टरमाइंड'ला बेड्या ठोका


मंत्री शिरसाट (Minister Sanjay Shirsat) म्हणाले की, "छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)शहर अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायांसाठी चर्चेत राहिले आहे. शहरातील नारेगाव सारखा भाग पाहिला तर परिस्थितीची भीषणता लक्षात येते. हा जिल्हा अनेकवेळा संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी आपण गर्भवती (pregnant) असल्याची खोटी माहिती दिली होती, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेऊन यातील 'मास्टरमाइंड'ला बेड्या ठोकणे गरजेचे आहे."



अटकपूर्व जामीन फेटाळला


निदा खान ही नाशिक टीसीएस प्रकरणातील (Nashik TCS case) मुख्य आरोपी आहे. 25 मार्चपासून ती फरार होती. तिने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने 2 मे रोजी तिचा अर्ज फेटाळला होता. निदा खानला पकडण्यासाठी नाशिक पोलीस बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होते. अखेर तिला पकडण्यात यश आले. आज तिला नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात येईल.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.