Nashik TCS Case : निदा खानचे मोठे कारस्थान ?, धर्मांतर प्रकरणामागे 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'चा संशय

Nashik TCS Case : नाशिकमधील काही प्रकरणे राज्य पातळीवर मोठ्या चर्चेचे विषय आहेत, त्यापैकीच एक म्हणजे नाशिकचे टीसीएस प्रकरण. टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न हे प्रकरण वैयक्तिक वादाचे नसून, एका संघटित कटाचे स्वरूप आहे. ज्याचे धागेदोरे अनेक थरांपर्यंत पोहोचले असून, परकीय निधी आणि ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’चेही मुद्दे त्यामध्ये आहेत. या कटातील मुख्य संशयित निदा खान अद्यापही फरार असून या प्रकरणात तिचा पाय आणखी खोलात गेला आहे. तिच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



देवळाली कॅम्प पोलिसांत (Deolali Camp Police Station )दाखल अत्याचार, विनयभंग व धार्मिक भावना दुखावल्याबाबत संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. दानिश आणि तौसिफ सध्या पोलिस कोठडीत असून, निदा खान मात्र २७ मार्चपासून पसार आहे. अटकपूर्व जामीनासाठी तिने न्यायालयात धाव घेतली होती. (Nashik TCS Case)


मात्र,गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने निदाचा अटकपूर्व जामीन (Anticipatory bail) अर्ज फेटाळून लावला. यासह निदाचा मोबाइल जप्त करणे आवश्यक असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे, तर पीडितेने केवळ एका व्यक्तीसोबतच्या प्रेमसंबंधातून आणि राजकीय हेतूने ही खोटी तक्रार केली आहे. संशयित तीन महिन्यांची गर्भवती असून, अटकेमुळे तिच्या अपत्याचे नुकसान होईल, यासह धर्मांतर किंवा जातीवाचक अपमान झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा निदाच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला होता.



तरुण आणि तरुणी सॉफ्ट टार्गेटवर


संशयित तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरूख कुरेशी, रझा मेमन आणि फरार संशयित निदा खान यांनी कंपनीतील एका तरुण आणि एका तरुणीला सॉफ्ट टार्गेट म्हणून हेरले होते. या दोघांचेही धर्मांतर करण्याची जबाबदारी वाटून घेण्यात आल्याचे धक्कादायक पुरावे एसआयटीने शोधले आहेत. तरुणाच्या धर्मांतराची ही जबाबदारी तौसिफ आणि दानिशकडे होती. त्याला वारंवार हॉटेल्समध्ये नेऊन मांसाहार करण्यासाठी बळजबरी करण्यात आली. तर, पीडितेवर इगतपुरी येथील एका रिसॉर्टमध्ये आणि टेकडी परिसरात अत्याचार करण्यात आले.(Nashik TCS Case)


तर पीडितांच्या धर्मातील देवदेवतांबद्दल खोटी माहिती पसरवून, त्यांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न होता. पोलिसांनी पीडितेकडून विशिष्ट धार्मिक पोशाख, बुरखा, पुस्तके, मोबाईल ॲप्स आणि काही संशयास्पद लिंक्स जप्त केल्या आहेत. न्यायालयाने हे कृत्य जाणीवपूर्वक आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटल्याने, या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले आहेत का, याचा तपास सुरू झाला आहे.(Nashik TCS Case)


या प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल असून, बहुतांश मुख्य संशयित कारागृहात आहेत. निदा एजाज खानचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला असून, एसआयटीने तिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६१ (२) (गुन्हेगारी कट रचणे) समाविष्ट केले आहे. या कलमांतर्गत मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे.

Comments
Add Comment

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.