Mayor Ritu Tawade : "मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त"

महापौर रितू तावडे उभ्या राहिल्या कोळी भगिनींच्या पाठीशी


मुंबई : वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोला सह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. "मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त", अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे.



वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यास महानगरपालिकेच्या स्थानिक प्रशासनाकडून मनाई केल्याचा कथित आरोप करणारे वृत्त विविध प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमातून प्रसारित झाले आहे. या अनुषंगाने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीगुरुवारी ७ मे २०२६ रोजी सकाळी वाकोला मासळी बाजारात प्रत्यक्ष भेट देऊन कोळी भगिनींची भेट घेतली. मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. कोळी भगिनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची ओळख आहे. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः आणि संपूर्ण मुंबई महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मासे कापण्याच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या पसरवल्या गेल्या, तो अपप्रचाराचा भाग आहे. त्याला कोणीही बळी पडू नये, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.



यावेळी स्थानिक मासळी व्यावसायिकांशीही महापौरांनी संवाद साधला. आपल्याला कोणीही रोखले नसल्याचे आणि कुणीही त्रास देत नसल्याचे देखील या कोळी भगिनींनी स्पष्ट केले. जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याशी संपर्क करावा, सर्व अडचणींचे निराकरण मी स्वतः करीन, असे महापौरांनी या कोळी भगिनींना आश्वासन दिले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून