Kerala Congress Headquarters : पुरुष आमदाराकडून महिला आमदाराला बळजबरीने मिठी मारण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर संताप

- केरळ काँग्रेस मुख्यालयातील धक्कादायक घटना


केरळ : केरळ काँग्रेस मुख्यालयाच्या (Kerala Pradesh Congress Committee) तिरुवनंतपुरम येथील मुख्यालयातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते चेरियन फिलिप (MLA ) यांनी नुकत्याच निवडून आलेल्या कोल्लमच्या आमदार बिंदू कृष्ण (Bindu Krishna) यांना त्यांच्या मनाविरुद्ध मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये बिंदू कृष्णा या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी कार्यक्रमस्थळी पोहोचताना दिसत आहेत. त्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अभिवादन करतात आणि त्यानंतर चेरियन फिलिप यांच्या दिशेने जातात. व्हिडीओनुसार, बिंदू कृष्णा यांनी सुरुवातीला हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्याचे दिसते. मात्र, त्यावेळी चेरियन फिलिप यांनी पुढे होत त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचे दृश्य समोर आले आहे.



विशेष म्हणजे, बिंदू कृष्णा या मागे सरकल्यानंतरही चेरियन फिलिप यांनी पुन्हा एकदा मिठी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चेरियन फिलिप यांच्या या कृतीनंतर बिंदू कृष्णा हात जोडून पुढे निघून जात परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


अनेकांनी सार्वजनिक आणि व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये वैयक्तिक मर्यादांचा आदर राखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. “एखादी व्यक्ती अस्वस्थ असल्याचे स्पष्ट दिसत असताना तिच्या वैयक्तिक स्पेसचा सन्मान राखला गेला पाहिजे,” अशा प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त केल्या जात आहेत. काहींनी हा प्रकार महिलांविषयीच्या संवेदनशीलतेच्या मुद्द्याशी जोडत राजकीय क्षेत्रातील वर्तनसंहितेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.







या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागल्या असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेत्यांच्या वर्तनाबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. महिला नेत्यांबाबत आदरयुक्त आणि संयमी वर्तनाची गरज असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, या प्रकरणावर ना चेरियन फिलिप यांनी, आणि नाही बिंदू कृष्णा यांनी अधिकृत आणि सविस्तर प्रतिक्रिया दिली. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून ‘संमती’, ‘वैयक्तिक मर्यादा’ आणि ‘सार्वजनिक शिष्टाचार’ या मुद्द्यांवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात