Dr. Neelam Gorhe : राज्यातील अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयीन सुनावणी आणि पीडित कुटुंबांना तातडीच्या मदतीची मागणी


मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यात अल्पवयीन मुली आणि मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांना पत्र पाठवून कठोर आणि तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनांचा उल्लेख करत त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितांना जलद न्याय देण्याची मागणी केली आहे.


डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळचे नातेवाईक आणि शेजारीच आरोपी असल्याने समाजात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. थेऊर येथे ६ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचाराचा प्रयत्न, लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, अकोल्यात १० वर्षीय चिमुकलीवर वृद्ध शेजाऱ्याकडून अत्याचार, कोल्हापुरात जन्मदाते वडील व नातेवाईकांकडून १५ वर्षीय मुलीवर पाच वर्षे सुरू असलेले अत्याचार तसेच सोलापुरात ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


या सर्व प्रकरणांचा तपास जलदगतीने पूर्ण करून तातडीने चार्जशीट दाखल करावी, आरोपींना जामीन मिळू नये यासाठी कठोर भूमिका घ्यावी आणि सर्व खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना POCSO कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.


तसेच प्रत्येक पीडित बालकाच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत ५ ते १० लाखांची आर्थिक मदत तत्काळ द्यावी, बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा आणि पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. पीडित कुटुंबांना सुरक्षित निवास, आर्थिक उपजीविकेच्या संधी, साक्षीदार संरक्षण आणि आवश्यक शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


या अत्यंत संवेदनशील प्रकरणांकडे वैयक्तिक लक्ष देऊन पीडित कुटुंबियांना तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

BHMS Doctors : बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी बंद, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत स्थगिती; वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

ED Raid : ₹10 हजार कोटींच्या कथित पॉन्झी घोटाळ्याने खळबळ; ED ची मोठी कारवाई! मुंबई-भोपाळमध्ये छापे, ₹30 कोटींची मालमत्ता गोठवली

Mumbai : मुंबई आणि भोपाळमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या मोठ्या कारवाईमुळे कथित 10 हजार कोटी रुपयांच्या सागा

Chandrakant Patil : विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ; संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण