Celina Jaitly : मुलाच्या कबरीजवळ सेलिना जेटलीला अश्रू अनावर; म्हणाली, “लग्नाने सर्व काही हिरावलं”

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली (Celina Jaitly) सध्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी आणि कठीण टप्प्यातून जात आहे. एकीकडे पती पीटर हागसोबतचा तिचा घटस्फोटाचा वाद न्यायालयात सुरू आहे, तर दुसरीकडे स्वतःच्या मुलाला गमावल्याचे दुःख तिला आतून पोखरत आहे. अलीकडेच सेलिनाने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला असून, तो पाहून चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी आले आहे. या व्हिडीओमध्ये ती तिचा दिवंगत मुलगा शमशेरच्या कबरीजवळ जाऊन त्याची स्वच्छता करताना दिसत आहे. मुलाच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या सेलिनाला यावेळी अश्रू अनावर झाले आणि ती स्वतःलाच सावरू शकली नाही.







हा व्हिडीओ शेअर करताना सेलिनाने एक मोठी भावनिक पोस्टही लिहिली आहे. तिने सांगितले की, गेल्या काही आठवड्यांमध्ये तिने आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण अनुभवले आहेत. “मी एक आई आहे आणि आता माझ्या भावना लपवणं शक्य नाही,” असं म्हणत तिने आपल्या मनातील दुःख जगासमोर मांडलं. हा व्हिडीओ शेअर करणं तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं, मात्र आपली वेदना आणि सत्य लोकांसमोर मांडण्याची गरज असल्याचं तिनं स्पष्ट केलं.


सेलिनाने तिच्या पोस्टमध्ये पती पीटर हागवर गंभीर आरोपही केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, कोर्टाचे आदेश असतानाही तिला तिच्या मुलांना भेटण्यापासून रोखण्यात आले. ती केवळ शमशेरलाच भेटू शकली, मात्र आता त्याचाही मृत्यू झाल्याने ती पूर्णपणे कोसळली आहे. एका आईसाठी स्वतःच्या मुलांपासून दूर राहण्याइतकं मोठं दुःख दुसरं काहीच नसतं, असं सांगताना सेलिना भावुक झाली. मात्र, ती हार मानणार नसून आपल्या मुलांसाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचंही तिनं स्पष्ट केलं.


लग्नानंतर आयुष्यात केलेल्या तडजोडींबद्दल बोलताना सेलिनाने सांगितले की, तिने कुटुंब आणि नात्यासाठी स्वतःचं करिअर, देश आणि कुटुंबियांनाही मागे सोडलं होतं. पतीसोबत राहण्यासाठी ती भारतातून दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रियापर्यंत गेली. पण एवढं सर्व काही करूनही तिच्या वाट्याला फक्त मानसिक त्रास, वेदना आणि संघर्षच आला, असा आरोप तिने केला आहे. मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं असून मानसिक छळाचाही सामना करावा लागल्याचं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.



दरम्यान, सेलिना जेटलीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी आणि चाहते तिच्या समर्थनार्थ पुढे येत असून तिला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेत्रीने नोव्हेंबर २०२५मध्ये पती पीटर हागविरोधात घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू असून, सेलिनाच्या या भावनिक पोस्टमुळे पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी