BMC News : प्रशासनाच्या मनमानी कारभाराला स्थायी समितीचा दणका

आठ रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम एकाच संस्थेला देण्याचा प्रस्ताव फेटाळला


मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायरसह उपनगरातील आठ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी तीन वर्षांकरता एकाच खासगी संस्थेची निवड करून स्थायी समितीच्या मान्यतेपूर्वीच कामे बहाल करण्यात आल्याने स्थायी समितीच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटले. एकाच संस्थेला आठ रुग्णालयांच्या स्वच्छतेची कामे देण्याचा प्रशासनाचा प्रकार चुकीचा असून या संस्थेने संगनमत करून हे काम मिळवल्याचे आरोप सर्वच सदस्यांनी केल्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवून दिला. दरम्यान, विरोधकांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली होती, परंतु विरोधकांची ही मागणी बहुमताने फेटाळून फेरविचारासाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला.


">मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर, नायर दंत, कुपर, जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटर, बोरीवली भगवती तसेच मुलुंड एम.टी.अगरवाल या रुग्णालयांतील स्वच्छता राखण्यासाठी निविदा मागवली आहे. यामध्ये यासर्व रुग्णालयांमधील स्वच्छतेसाठी ऑरा एफएमएस लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. आठही रुग्णालयांमध्ये या एकाच कंपनीच्या माध्यमातून काम केले जाणार असून प्रति चौरस फुटांसाठी प्रत्येक रुग्णालयासाठी मासिक सहा ते सात रुपये एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. यासाठी तीन वर्षांकरता सुमारे १०१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.



याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी एकाच कंपनीला आठ रुग्णालयांच्या स्वच्छतेची कामे देणे आणि तसेच कंत्राट कामांमध्ये संगनमत असल्याचे सांगत याचा खुलासा केला जावा याकरता हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी केली.तर काँग्रेसचे अश्रफ अाझमी यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची सूचना केली. भाजप आमदार मिहिर कोटे यांचा यासंदर्भात घोटाळ्याचा आरोप केल्यामुळे हा प्रस्ताव रेकॉर्ड करावा अशी मागणी करतानाच त्यांनी मनुष्यबळ आणि साहित्य पुरवण्यासाठी मासिक ९२ लाखांचा खर्च येत असताना ही कंपनी ७४ लाख रुपये घेणार आहे. मग १८ लाख रुपये कमी कसे असा सवाल केला. यशवंत किल्लेदार यांनी ७७ कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप केला तर फणसे यांनी रुग्णालयांसाठी स्वतंत्रपणे अशाप्रकारची कंत्राटे देण्यात यावीत अशी मागणी केली. तेजिंदर तिवाना यांनी या कंत्राट कामांमध्ये ऑरा आणि सिग्मा या कंपन्यांनी कशाप्रकारे रिंग केली आहे याची जंत्रीच वाचून दाखवली. तसेच कामगारांचे पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र आणि हमी पत्र लिहून घेण्याची मागणी केली.तर जमिर कुरेशी यांनी बाथरुम आणि आयसीयूसाठी स्वतंत्र सफाई केली जावी अशी सूचना केली. तर आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी हा प्रस्ताव आज याठिकाणी मंजुरीला आला असला तरी मार्च महिन्यांपासून या कंपन्यांच्या माध्यमातून कामांना सुरुवात झाल्याचे सांगितले. त्यामुळे एकप्रकारे स्थायी समितीला गृहित धरण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. तर काही सदस्यांनी भगवती आणि मुलुंड एम टी अगरवाल रुग्णालयांचा समावेश मेजर हॉस्टिलमध्ये कधी झाला तर या दोन्ही रुग्णालये आता नवीन वास्तूंमध्ये भरली जाणार आहे, त्यांचे क्षेत्रफळ हे जुन्या जागांचे आहे की नवीन जागांचे आहे याबाबत स्पष्टता नाही. तर कामगारांच्या आरोग्याबाबत कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही, तसेच या कंपन्यांचा महापालिका रुग्णालयांमध्ये काम करण्याचा अनुभव काय आहे, प्रशासन अजूनही प्रशासकाच्या काळातच असल्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडत असल्याचे सदस्यांनी सांगितले.



यावेळी चर्चेत प्रिती सातम,अजंता यादव, तुलिफ मिरांडा, शीतल गंभीर आणि श्रध्दा जाधव यांनी भाग घेतला. यावेळी प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची विरोधकांची मागणी फेटाळून फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी मंजूर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असून हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवताना याची सर्वकंष चौकशी करण्यात यावी असे निर्देश दिले आहे. तसेच ज्यांनी ही निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार कंपनीला मदत केली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,असे निर्देश दिले.

Tags
kem hospitalbmc newsBMC Hospitalsmunicipal hospitals
Comments
Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा