Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये विद्युत यंत्रणांवर ताण येऊन शॉर्ट सर्किट, ओव्हरलोडिंग यांसारख्या कारणांमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईकरांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मुंबई अग्निशमन दलास अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.


मुंबई महानगरात तापमान वाढत आहे. उन्हाळा प्रखरतेने जाणवत आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी संकुलांमध्ये पंखे, एअर कुलर, एअर कंडिशनर, फ्रिज व इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. याशिवाय उष्ण व कोरडे वातावरण, ज्वलनशील पदार्थाची अयोग्य साठवणूक, कचरा जाळणे तसेच गॅस गळती यांसारख्या कारणांमुळेही आग लागण्याचा धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घरातील व इमारतीतील विद्युत वायरिंग, स्विच बोर्ड आणि प्लग पॉइंट्स यांची नियमित तपासणी करुन त्यांच्या जोडणीबाबत खात्री करावी. तसेच एका प्लग पॉइंटमध्ये अनेक उपकरणे जोडून ओव्हरलोडिंगसारखे प्रकार टाळणे गरजेचे आहे.


एअर कंडिशनर, कुलर इत्यादी उपकरणे वापरताना सुरक्षित व दर्जेदार विद्युत जोडणीचा वापर करावा. घरात किंवा परिसरात कचरा, झाडांची, वेलींची कोरडी पाने किंवा इतर ज्वलनशील वस्तू जाळू नये. एलपीजी गॅस सिलिंडर व गॅस पाईपची संबंधित तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करावी. प्रत्येक इमारतीतील, घरातील व निवासी / अनिवासी दालनातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहेत का, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.


इमारतींचे, व्यापारी संकुलांचे जिने तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवावेत. जेणेकरून एखादी घटना घडल्यास नागरिकांना सुखरुपपणे बाहेर पडता येईल. यासोबतच आपली वाहने निश्चित केलेल्या जागेत उभी करावीत. दुर्दैवाने कुठे आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांच्या मुक्त व सुरळीत हालचालीसाठी आवश्यक तेवढी पुरेशी जागा मोकळी ठेवावी. कोणत्याही प्रकारची आग लागल्यास घाबरून न जाता तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ किंवा ०२२-२३००१३९०, ०२२-२३००१३९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख अग्निमशन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे