SIR' formula in Maharashtra : पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रात ‘एसआयआर’ फॉर्म्युला

२०२९च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; सर्व लहान-थोर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार


मुंबई : पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे मानले जाते. आता हाच कित्ता महाराष्ट्रात गिरवत मराठी मुलूखावर घट्ट पकड निर्माण करण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी बुधवारी दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.



">राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, जयकुमार गोरे, नितेश राणे, अतुल सावे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानपरिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



भाजपने 'एसआयआर' मोहिमेच्या तयारीसाठी एक विस्तृत कार्यक्रम आखला आहे. सुरुवातीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर, टप्प्याटप्प्याने पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना विभागीय पातळीवर प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर आमदार, खासदार आणि मंत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून, अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.



२०२९मध्ये स्वबळाची चर्चा


भाजपच्या या विशेष मोहिमेमुळे आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना, "भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. आपण स्वबळावर चालणारा पक्ष आहोत," असे सूचक विधान केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी रणनीती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Tags
west bengalwest bengal electionSIR' formula in Maharashtrabengal
Comments
Add Comment

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या