भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका
मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपाचा विजय झाल्यानंतर दिवा विझताना मोठा होतो तसा भाजपाचा हा विजय असल्याचे संजय राऊत म्हणत आहेत. मात्र संजय राऊत यांनीच मशाल विझवण्याची सुपारी घेतली असून उबाठाचा शेवटचा दिवा विझवण्याचे काम ते करत असल्याची सणसणीत टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा हा सुर्य असल्याने जनतेचे आशीर्वाद सोबत आहेत तोपर्यंत भाजपाचा पराभव होणार नसल्याचा विश्वासही बन यांनी व्यक्त केला. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
एखाद्याला नोकरीवरून काढून टाकल्यावर मी राजीनामा देणार नाही, या भूमिकेला काही अर्थ नसतो. जनतेने तुम्हाला पश्चिम बंगालमधून काढून टाकल्याने तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला काय. पराभव स्वीकारला का किंवा नाही स्वीकारला, याने काहीही फरक पडत नाही. लोकांचा आदर करणे हे ममता बॅनर्जींनी कधीच केले नाही. जनमताचा कधीही सन्मान राखला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जींची ही भूमिका काही नवी नाही. पंधरा वर्षे ममता दीदींनी पश्चिम बंगालमध्ये दादागिरी केली. आता जनतेने नाकारल्यानंतरही त्यांची दादागिरी सुरू आहे. पण संजय राऊत त्याचे समर्थन करताहेत. संजय राऊत, तुम्ही ममता दीदींच्या या आंदोलनात थेट पश्चिम बंगालमध्ये जाऊन सहभागी व्हा आणि त्यांना पाठिंबा द्या, असे बन यांनी सुनावले.
Shimla Court : शिमला येथे न्यायालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी
“दिल्लीपर्यंत आवाज जाईल” असा पोस्टरमधून इशारा, सुरक्षा यंत्रणा सतर्क शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील तीन शाळांना धमक्या मिळाल्यानंतर आता आणखी ...
बन म्हणाले की भाजपा जनतेच्या जीवावर निवडून येते, जनतेची सेवा करते आणि मग निवडणूक जिंकते. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याप्रमाणे घरात बसण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचा कोणताही नेता करत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपद गेले होते तेव्हा विधान परिषदेचा राजीनामा देईन, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर चार वर्षे राजीनामा दिला नाही. मात्र उद्धव ठाकरे घरी बसले. ममता दीदी आता विधानसभेमध्ये जाऊही शकत नाहीत. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला नाही, असे बन म्हणाले.
SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?
SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. सदर भरती प्रक्रियेत खाजगी ...
भोरमध्ये एका चिमुकलीवर अन्याय झाला. अतिशय अमानवी कृत्य केले. त्या प्रकरणामध्ये सरकार सजग आहे. पूर्णपणे कारवाई करून त्या आरोपीला तातडीने फासावर लटकवण्याचे काम सरकारच्या माध्यमातून निश्चित केले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. या प्रकरणात तरी किमान राजकारण करू नये. जरांगे पाटील म्हणाले की, ममता बॅनर्जींचा पराभव कधी होऊ शकत नाही. त्यांचा पराभव झाला म्हणजे काहीतरी काळबेरे आहे. जरांगे पाटील यांचे जे कोणी सल्लागार असतील त्यांना मला सांगायचे की किमान जरांगे पाटलांना नीट माहिती द्या, असे बन म्हणाले.






