रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक; छगन भुजबळ केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना वेग
- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजीची चर्चा मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपतच राज्याच्या ...
नियमावलीनुसार, कोणत्याही लोकप्रतिनिधीने दोन्ही सभागृहांत (विधानसभा आणि संसद) एकाच वेळी राहू नये, यासाठी १४ दिवसांच्या आत एका सभागृहाचा राजीनामा देणे बंधनकारक असते. त्यानुसार, बारामती विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी बुधवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांना तब्बल २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधातील २२ उमेदवार आणि 'नोटा'ला मिळून अवघी ४ हजार ८३७ मते मिळाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये नोंदवलेला मताधिक्याचा विक्रम मोडीत काढत सुनेत्रा पवार यांनी हा विजय संपादन केला. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यापूर्वीच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हेही खासदार झाले असून, गेल्याच महिन्यात त्यांनी राज्यसभेची शपथ घेतली होती.
पुणे / अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तर अक्षय ...
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या शर्यतीत तीन प्रमुख नावांची चर्चा असून, त्यापैकी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. भुजबळ हे साध्य फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून, राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील केंद्रीय मंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या शर्यतीत दुसरे महत्त्वाचे नाव जय पवार यांचे आहे. सुरुवातीला त्यांना विधान परिषदेवर पाठवून आमदारकी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, पक्षाने विधान परिषदेसाठी झिशान सिद्दिकी यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर जय पवार यांना राज्यसभेवर संधी मिळाली, तर पार्थ पवार यांच्यापाठोपाठ जय पवार देखील संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाहायला मिळतील. तिसरे नाव म्हणजे नितीनकाका पाटील. सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई येथील एका प्रचारसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीनकाका पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. आता अजित पवार यांच्या पाश्चात पक्षाकडून हा शब्द पाळला जातो का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.






