Thalapathy Vijay : थलपती विजय ‘किंगमेकर’च्या शोधात!

चेन्नई : थलपती विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने तमिळनाडूमध्ये इतिहास रचला. द्रविडी राजकारणाभोवती सत्ताखुर्चीचा खेळ करणाऱ्या द्रमुक आणि आण्णाद्रमुक यांना पछाडून विजय यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला. टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. सत्ता स्थापनेसाठी विजय यांना छोट्यामोठ्या पक्षांना बरोबर घ्यावे लागणार आहे. शिवाय युती सरकार स्थापन करण्यासाठी आता टीव्हीकेकडून काँग्रेसबरोबर बोलणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.


थलपती विजय विरोधी पक्षांसोबत युती करण्याची योजना आखत आहे. टीव्हीके काँग्रेससह विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी युतीबाबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. या पक्षांना लवकरच चर्चेसाठी निमंत्रण पाठवले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा द्रमुक पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज जवळपास सर्व संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. पण, यावेळी द्रमुकला केवळ ५९ जागांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, याबाबत काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांना विचारण्यात आले असता, “तमिळनाडूचे हित, पक्षातील सर्वांची मतं विचारात घेऊन निर्णय घेईल”, असे त्यांनी म्हटले. “तमिळनाडूच्या निकालाचे सूक्ष्म विश्लेषण केले जाईल, पण राज्यातील जनतेने जो कौल दिला आहे तो आम्ही नम्रपणे स्वीकारतो”, असेही सेंथिल पुढे म्हणाले.


वरिष्ठ घेणार निर्णय : विजय यांच्या टीव्हीकेबरोबर असलेल्या मतभेदांबाबत सेंथिल यांना विचारले असताना त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करण्याची गरज बोलून दाखवली. पक्षात अनेक मतमतांतरे आहेत. आम्हाला पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. आम्ही संधीसाधू नाही. आमची विचारधारा आणि नागरिकांना दिलेल्या आश्वासनांशी आम्ही प्रामाणिक आहोत, अशी भूमिका सेंथिल यांनी मांडली. केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो तमिळनाडूच्या जनतेच्या हिताचा निर्णय घेईल, असेही त्यांना स्पष्ट केले.

Comments
Add Comment

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

WhatsApp New Features Update : WhatsApp वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! Metaकडून ३ नवी सुरक्षा फीचर्स; अकाउंट हॅकिंगला बसणार आळा

मुंबई : WhatsApp वापरकर्त्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी Metaने तीन नवीन सुरक्षा अपडेट्स जाहीर केले आहेत. यामध्ये

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.