Navapur Bird Flu : नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव; चार दिवसांत १.९३ लाख कोंबड्या नष्ट

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यू (H5N1) चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अवघ्या चार दिवसांत जवळपास १ लाख ९३ हजारांहून अधिक कोंबड्या, ८ लाखांपेक्षा जास्त अंडी आणि सुमारे २१ टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे.


काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला. मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता त्यात बर्ड फ्ल्यू विषाणूची (H5N1) पुष्टी झाली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबवत बाधित क्षेत्रात कत्तल मोहीम सुरू केली.



या मोहिमेदरम्यान विविध पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आले. चौथ्या दिवशी मुजतबा आणि परवेज पोल्ट्री फार्ममध्येच ५६ हजारांहून अधिक पक्ष्यांचा नाश करण्यात आला.


नवापूर हा भाग कुक्कुटपालन व्यवसायासाठी ओळखला जातो. मात्र या प्रादुर्भावामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.



प्रशासनाने बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून पोल्ट्री उत्पादनांची वाहतूक व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे ५० कर्मचारी आणि विशेष पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहेत.नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या