Minister Nitesh Rane : आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ पनवेल येथे उभारणार – मंत्री नितेश राणे

मुंबई : पनवेल येथे प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.


सदर प्रकल्प साध्या दर्जाचा न ठेवता देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारा असावा. यासाठी सखोल अभ्यास करून सुस्पष्ट व व्यवहार्य आराखडा तयार करावा. शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.



या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर निवेदन सादर केले.


">पनवेल येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले मत्स्य उपकेंद्र समुद्रमुखाजवळ (estuary) स्थित असून सागरी व अंतर्जल परिसंस्थेच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या ठिकाणी सुमारे १० एकर क्षेत्रावर ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. प्रकल्पामध्ये जागतिक दर्जाचे सागरी व गोड्या पाण्यातील जीवसृष्टी प्रदर्शन तसेच सी लायन शोसारखे आकर्षक उपक्रम समाविष्ट करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.


पनवेल हे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्यामुळे या प्रकल्पाद्वारे देश-विदेशातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करता येईल. तसेच पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचा अभ्यास आणि शैक्षणिक मूल्यवर्धनासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.



बैठकीत प्रकल्पाच्या व्यवहार्यता अभ्यासास गती देणे तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी संबंधितांना निर्देश दिले.


या बैठकीस आमदार विक्रांत पाटील, मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्यउद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Tags
panvelMinister Nitesh RaneInternational Airport'Skyla Aquarium and Sea Lion Entertainment CentFisheries and Ports Minister Nitesh Rane
Comments
Add Comment

Free School Bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारकडून १७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या

Western Railway Food and Water Safety : पश्चिम रेल्वेची अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी कडक तपासणी; 98 टक्के अन्न नमुने, तर 99.87 टक्के पाणी नमुने सुरक्षित

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा

BMC Pedestrian First Initiative : दहिसर-बोरिवली परिसराची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांनी केली पाहणी

पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त मार्गिका मुबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती