मोठी बातमी ! कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस

West Bengal : कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त (DCP) शांतनु सिन्हा बिस्वास सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईमुळे चर्चेत आहेत. ईडीने शांतनु सिन्हा यांच्याविरोधात 'लुकआउट' नोटीस जारी केली आहे. ते देश सोडून पळून जाण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. दक्षिण कोलकात्याच्या (West Bengal) बालीगंज भागातील गाजलेल्या 'सोना पप्पू सिंडिकेट' (Sona Pappu Case) प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.


यामुळे पश्चिम बंगालमधील सत्ता परिवर्तनाच्या धामधुमीत आता प्रशासकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात 'लुकआउट' नोटीस जारी केली आहे. शांतनु सिन्हा बिस्वास हे यापूर्वी कालीघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत होते. हा परिसर भवानीपूर विधानसभा मतदारसंघात येतो, जिथून ममता बॅनर्जी प्रतिनिधित्व करत होत्या.(ED's 'lookout' notice against Kolkata DCP)


विशेष म्हणजे, ४ मे रोजी लागलेल्या निकालात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा याच भवानीपूर मतदारसंघातून पराभव केला आहे. सत्तेच्या बदलासोबतच आता या हाय-प्रोफाईल पोलीस अधिकाऱ्यांभोवती तपास यंत्रणांचा फास आवळला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.वारंवार चौकशीला उपस्थित न राहिल्याने किंवा देश सोडून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरोधात आता 'लूकआउट' नोटीस जारी करण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता देशाबाहेर प्रवास करता येणार नाही आणि विमानतळावर दिसताच त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकते. (ED's 'lookout' notice against Kolkata DCP)


'सोना पप्पू सिंडिकेट' प्रकरण काय आहे?


दक्षिण कोलकातामधील बालीगंज येथील रहिवासी असलेल्या सोना पप्पू यांच्यावर जमीन बळकावणे आणि खंडणीसह अनेक आरोप आहेत. त्यांच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशा अनेक आरोपांनंतर ईडीने तपास सुरू केला. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात व्यावसायिक जॉय कामदार यांना आधीच अटक केली आहे.या प्रकरणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ईडीने या महिन्यात फर्न रोडवरील शंतनू बिस्वास यांच्या घरावर छापा टाकला. शोधमोहीम सुरू झाल्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. शोधमोहिमेच्या दुसऱ्या दिवशी, ईडीने सोना पप्पू प्रकरणाच्या संदर्भात शंतनू बिस्वास आणि त्यांचे दोन मुलगे, सायंतन आणि मनीष यांना सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये बोलावले. मात्र, त्या दिवशी त्या दोघांपैकी कोणीही ईडी कार्यालयात गेले नाही.

Comments
Add Comment

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून