मुंबई : अनन्या बिर्ला हिनं Met Gala 2026 मध्ये पहिल्याच उपस्थितीत जबरदस्त छाप पाडली. मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (Metropolitan Museum of Art) येथील रेड कार्पेटवर उतरलेल्या अनन्याच्या हटके आणि कलात्मक लूकने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला.
यावर्षी फॅशन ही कला आहे “Fashion Is Art” या थीमनुसार अनन्याने सुरक्षित पर्याय न निवडता धाडसी आणि संकल्पनात्मक लूक सादर केला. रॉबर्ट वुन (Robert Wun) याने डिझाइन केलेल्या कस्टम कुट्यूर आउटफिटमध्ये ती झळकली. टाइट फिटिंग ब्लेझर-स्टाइल बॉडीस, शार्प शोल्डर्स आणि खाली पसरणारी भव्य प्लीटेड स्कर्ट यामुळे तिचा लूक अत्यंत भव्य आणि सिनेमॅटिक वाटत होता.
न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'मेट गाला २०२६' (Met Gala 2026) या फॅशन विश्वातील अत्यंत मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या सोहळ्यात यंदा भारतीय ...
या संपूर्ण लूकची स्टायलिंग रिया कपूर यांनी केली. त्यांनी या लूकमध्ये मिनिमल अॅक्सेसरीज वापरत डायमंड चोकरने एलिगन्स वाढवली, तर सॉफ्ट हेअरस्टाइल आणि नैसर्गिक मेकअपने संपूर्ण फोकस आउटफिटवरच ठेवला.
कॅलगरी : कॅनडातील कॅलगरी येथे गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘ऑरा टूर’ नावाच्या कॉन्सर्टदरम्यान अनपेक्षित तणाव निर्माण झाला. कार्यक्रम सुरू ...
View this post on Instagram
तिने ‘Svatantra’ मायक्रोफायनान्स कंपनी आणि ‘Ikai Asai’ डिझाइन ब्रँडची स्थापना केली आहे. संगीत क्षेत्रातही तिने ५०० मिलियनहून अधिक ग्लोबल स्ट्रीम्स मिळवत विक्रम केले आहेत. याशिवाय, आई नीरजा बिर्ला यांच्यासोबत ‘Mpower’ उपक्रमाद्वारे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचे कामही ती करते.
एकूणच, मेट गालावर अनन्या बिर्लाचा हा लूक फक्त फॅशनपुरता मर्यादित न राहता कला, ओळख आणि सामर्थ्य यांचा संगम ठरला आहे.





