Iran Attak on UAE : इराणच्या हल्ल्यात ३ भारतीय जखमी, युएईमधील घटनेचा भारताकडून तीव्र निषेध

नवी दिल्ली : अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नसून उभय देशातील तणाव वाढतच असल्याचे चित्र आहे. अशातच इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारतीय नागरिक जखमी झालेली ही घटना अस्वीकार्य असल्याचे भारताने स्पष्ट केले.


फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनवर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाल्याची घटनेचा निषेध करणारे निवेदन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसिद्ध केले. तीन भारतीय नागरिक जखमी झालेल्या फुजैराहवरील हल्ला पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही हे शत्रुत्व आणि नागरी पायाभूत सुविधा तसेच निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे त्वरित थांबवण्याचे आवाहन करतो,” असे जयस्वाल यांनी निवेदनात म्हटले आहे.


मध्य पूर्वेत शांतता आणि स्थैर्य निर्माण होण्यासाठी भारत नेहमीच चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्राधान्य देईल, अशी भूमिकाही परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतूक पूर्ववत व्हावी अशी मागणीही भारताने केली आहे. शांततेतून मार्ग काढण्यासाठी भारत सर्व आवश्यक सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचेही भारताने स्पष्ट केले.


पंतप्रधान मोदींकडून निषेध : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील तीव्र शब्दात या हल्ल्यात भारतीय नागरिक जखमी झालेल्या घटनेचा निषेध केला. “नागरिकांना लक्ष्य करणे आणि पायाभूत सुविधांवर हल्ला करणे अस्वीकार्य आहे. भारत युएईबरोबर खंबीरपणे उभा असून, शांततेतून मार्ग काढण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास तयार आहे. होर्मुझमधून सुरक्षित आणि विनाअडथळा वाहतूक होणे प्रदेशातील शांतता, स्थैर्य आणि जागतिक उर्जा सुरक्षेसाठी महत्वाचे आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


इराणकडून खंडन : संयुक्त अरब अमिराती देशाकडून या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली आहे. हवाई सुरक्षा प्रणालीमध्ये १५ क्षेपणास्त्र डागल्याचे दिसून आले. इराणकडून चार ड्रोन सोडण्यात आले होते. यापैकी एक ड्रोन फुजैराह पेट्रोलियम इंडस्ट्रीज झोनवर आदळला यामुळे सर्वात मोठ्या तेल प्रक्रिया प्रकल्पात आग लागली, यात याठिकाणी काम करणारे तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. इराणने मात्र, हा हल्ला त्यांच्याकडून करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. तेहरानच्या माध्यमांनी देखील हल्ल्याच्या वृत्तांचे खंडन केल्याचे समोर आले आहे.

Comments
Add Comment

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर

Kenya Helicopter Crash : केन्यामध्ये सफारीसाठी निघालेल्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; 5 अमेरिकन पर्यटकांसह सर्व 7 जणांचा मृत्यू

नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल