Monday, May 4, 2026

Mumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर देशातील अत्याधुनिक क्रॅश बॅरिअर प्रणाली कार्यान्वित; गोदरेज आणि डेल्टाब्लॉकचा पुढाकार

Mumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर देशातील अत्याधुनिक क्रॅश बॅरिअर प्रणाली कार्यान्वित; गोदरेज आणि डेल्टाब्लॉकचा पुढाकार

राज्यातील महत्त्वाच्या महामार्गावरील रस्ते सुरक्षा उपाययोजना भक्कम होणार.

मुंबई : गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुपने (Godrej Enterprices Group) रस्ते सुरक्षा क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीच्यावतीने मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक (Mumbai-Pune Missing Link Project) प्रकल्पावर भारतातील पहिली अत्याधुनिक प्रीकास्ट काँक्रीट क्रॅश बसवण्यात आली आहे. ऑस्ट्रियातील डेल्टाब्लॉक या जागतिक आघाडीच्या कंपनीच्या सहकार्याने ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महामार्गावरील प्रवास आता अधिक सुरक्षित होईल.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. प्रवाशांसाठी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास जलद आणि सुरक्षित करुन देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पासाठी गोदरेजने जागतिक स्तरावर सिद्ध झालेल्या डेल्टाब्लॉक प्रणालीचा वापर केला आहे. ही प्रणाली युरोपियन मानक EN 1317 सारख्या सक्त आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांची पूर्तता करते. ही यंत्रणा अपघाताच्या वेळी वाहनाची धडक रोखते. त्यामुळे प्रवाशांना अपघातामुळे होणारी शारिरीक इजा टाळता येते. जगभरातील ४५ हून अधिक देशांतील वेगवाग रस्ते आणि आव्हानात्मक वळणांवरील अपघात टाळण्यासाठी ही यंत्रणा डिझाइन करण्यात आली आहे.

या तंत्रज्ञानाबद्दल गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे ईव्हीपी आणि बिझनेस हेड अनूप मॅथ्यू म्हणाले,” भारतात विकासाच्या आगामी टप्प्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे. अशा प्रत्येक प्रकल्पात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. डेल्टाब्लॉकच्या माध्यमातून आम्ही भारतात जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेले तंत्रज्ञान परिचित करुन दिले आहे. हे आमच्या तांत्रिक अनुभवामुळे शक्य झाले. सुरक्षित महामार्ग आणि भक्कम वाहतूक व्यवस्था उभारणीसाठी सरकारसोबत काम करताना आम्हांला अभिमान वाटतो.“

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उभारणीतून सरकारचे शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब झळकते. या प्रकल्पाच्या बांधकामात पूनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने अशा पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींमध्ये पुढाकार घेतला आहे. कंपनी भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्ससोबत काम करत आहे. याचसह, गोदरेजच्या रिसायकल कन्स्ट्रक्शन मटेरिअल्स व्यवसायात वार्षिक ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यावरणास पूरक आणि उच्च दर्ज्याच्या बांधकाम साहित्याला आता मोठी मागणी येऊ लागली आहे, हेच यातून स्पष्ट होते.

कंपनीची ही वचनबद्धता सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये दिसून येते. गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुप नाविन्यपूर्ण आणि उच्च गुणवत्तेची अभियांत्रिकी सोल्यूशन्स पुरवत आहे. मुंबई कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक, मुंबई मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्पांतही कंपनीचे मोठे योगदान आहे. नवीन आणि शाश्वत तंत्रज्ञान विकसित करुन भारताच्या आधुनिक पायाभूत सुविधांना आकार देण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >