Nashik Crime : 'तुझे माझ्या बायकोशी लफडे', तुला संपवूनच टाकतो'...;पत्नीसोबतच्या अनैतिक संबधाच्या संशयावरून मित्रांमध्ये थरार

Nashik Crime : अनैतिक संबंधाच्या अनेक घटना सध्या समोर येत आहे. बऱ्याचदा संशयावरून नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो, तर कधी कधी हा संशय जीवावर देखील बेततो. अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. एकलहरा जवळील राखेच्या खाणीजवळ पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाने आपल्याच मित्राचा गळा चिरण्याचा आणि पोटात सुरा खुपसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ( Nashik Crime News )


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी प्रभाकर नानाभाऊ साळवे (४१, रा. श्रमिकनगर, ओझर) हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतत तर संशयित आरोपी सचिन उर्फ मुरलीधर सिताराम धोंडगे (रा. डोंगरेज, ता. सटाणा) हा त्याचा मित्र आहे. हल्ला करण्याच्या पूर्वतयारीत असलेला सचिन याने १ मे रोजी दुपारी प्रभाकर यांना फोन करून 'पत्नीला भेटायला एकलहरा येथे जायचे आहे, मला ओझरवरून पिकअप कर' असे सांगितले. मित्राच्या शब्दावर विश्वास ठेवत प्रभाकर रात्री ८ वाजता ओझर १० व्या मैलावर पोहोचले. ( Nashik Crime News )


दोघेही दुचाकीवरून एकलहराकडे निघाले. 'पत्नीचे लफडे सुरू असून तिला रंगेहाथ पकडायचे आहे, आपण शॉर्टकटने जाऊ' असे सचिनने प्रभाकरला सांगितले आणि एकलहरा गावाजवळील राखेच्या खदाणीच्या निर्जन रस्त्यावर नेले. रात्री ९:१५ च्या सुमारास सचिनने लघवीचा बहाणा करून गाडी थांबवण्यास सांगितली. रस्ता सामसूम असल्याने प्रभाकर यांनी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करताच सचिनने बॅगेतून धारदार हत्यार काढून थेट प्रभाकर यांच्या गळ्याला लावले.


यानंतर घाबरलेल्या प्रभाकरचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून दोघे खाली पडले. खाली पडल्यानंतर सचिनने आरडाओरडा करत "तुझे माझ्या बायकोशी लफडे आहे, तुला संपवूनच टाकतो" असे म्हणून प्रभाकर यांच्या पोटावर जोरात वार केला. प्रभाकर यांनी प्रसंगावधान राखत तो वार हाताने पकडला, ज्यामध्ये त्यांच्या हाताची बोटे गंभीररीत्या कापली गेली. ( Nashik Crime News )


प्रभाकर यांने गंभीर जखमी अवस्थेतच कसाबसा जीव वाचवत तिथून पळ काढला आणि एका वाहनधारकाच्या मदतीने सुरक्षारक्षकांपर्यंत पोहोचला. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रभाकरला तातडीने बिटको आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीच्या अटकेसाठी चक्रे फिरवली आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Indian Superfoods : फिट राहायचंय? मग विदेशी नव्हे, आहारात आजच समाविष्ट करा हे देशी सुपरफूड्स

मुंबई : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक जण चिया सीड्स, क्विनोआ, अवोकाडो, ब्लूबेरी यांसारख्या महागड्या विदेशी

Water Intake : मानवी शरीराला किती पाणी आवश्यक असते; रोज किती पाणी प्यावे? सविस्तर माहिती

तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता? आपल्या शरीराला किती लीटर पाणी पुरेसे असते, अति प्रमाणात पाणी प्यायल्याने काय

Old Saree Reuse : फेकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा! जुन्या साडीपासून बनवा घरासाठी 'या' 8 शानदार गोष्टी

तुमच्याही कपाटात जुन्या साड्या पडून आहेत का? त्या फेकून देण्याचा विचार करत असाल, तर आधी एकदा थांबा! कारण या जुन्या

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

`Monsoon Health Tips : पावसाळ्यातील सर्व आजारांवर रामबाण उपाय; स्वयंपाक घरातील पदार्थ वापरुन सहज तयार करा

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून तयार होणारा औषधी काढा कसा बनवायचा चला पाहूया पावसाळा सुरू

Simhastha Kumbh Mela 2027 : पर्यावरणपूरक कुंभमेळ्याच्या दृष्टीने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनावर तांत्रिक सल्लागार समितीची चर्चा

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, शाश्वत आणि भाविकाभिमुख करण्याच्या दृष्टीने स्वच्छता, घनकचरा