Stock Market : निवडणुकीचे कल येऊ लागताच गुंतवणूकदारांमध्ये संचारला उत्साह

मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आलेले कल बघता भाजपची सर्वच राज्यात आधीच्या तुलनेत चांगली कामगिरी होत असल्याचे दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. यामुळे निफ्टी फिफ्टी २३७.४५ अंकांनी वधारला असून २४,२४३.०० वर पोहोचला आहे. याआधी शुक्रवारी निफ्टी फिफ्टी २३,९९७.५५ वर बंद झाला होता. बीएसई सेन्सेक्स ८२४.१६ अंकांनी वधारला असून ७७,७३३.६० वर पोहोचला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स ७६,९१३.५० वर बंद झाला होता.


हाँगकाँगचा हँग सेंग १.४ टक्क्यांनी वधारला तर ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स २०० ने घसरला. जपान आणि चीनमधील बाजार 'गोल्डन वीक'च्या सुट्ट्यांमुळे बंद होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी ३.८ टक्क्यांनी आणि तैवानचा ताईक्स ४.२ टक्क्यांनी वाढला. एस अँड पी ५०० ने उच्चांक गाठला, तर नॅसडॅक आणि इतर निर्देशांकही स्थिर राहिले.



अमेरिकन क्रूड प्रति बॅरल १०१.७४ डॉलरच्या घरात आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल १०८.१९ च्या दराने उपलब्ध आहे. पश्चिम आशियातील युद्धाबाबतची अनिश्चितता कायम आहे.



एप्रिल २०२६ मध्ये निफ्टीने ५.८१ तर सेन्सेक्सने ५.१७ टक्के सरासरी परतावा दिला. ही डिसेंबर २०२३ नंतरची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. एप्रिल महिन्यात जवळपास सर्व प्रमुख कंपन्यांच्या शेअरच्या दरात वाढ झाली. मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्येच नाही तर मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरच्या दरातही वाढ दिसून आली. स्मॉल कॅप इंडेक्समध्ये २० तर मिड कॅप इंडेक्समध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली. एप्रिलमध्ये भारतीय शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल ५१ ट्रिलियन रुपयांनी वाढून ४६३.३ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले. ही आतापर्यंतची सर्वात मोठी मासिक वाढ आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav : गणपती बाप्पा मोरया ! विघ्नहर्त्याचे कृपेने गणेशोत्सवातील मोठे विघ्न टळले; गणेश भक्त, मूर्तिकार, कामगार, गणेशोत्सव मंडळांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : गणेश मूर्ती विसर्जनाबाबत गतवर्षी म्हणजे २०२५ ला न्यायालयाने दिलेल्या निवाड्या प्रमाणे याही वर्षी

Chamoli Tunnel Tragedy : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बोगदा दुर्घटना, ७ ठार आणि ३ अद्याप बेपत्ता

चमोली : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सात

Road Accident : नैनितालमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्यामुळे २० पर्यटक जखमी

नैनिताल : चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेला २४ तास होण्याआधीच उत्तराखंडमध्ये आणखी एक मोठी

Mantralaya : मंत्रालयातील कॅन्टीनचा 'लूक' बदलणार

- ३ कोटींचा निधी मंजूर; खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारण्यासोबत स्वच्छतेवर भर देणार मुंबई : राज्याचे प्रशासकीय

Navi Mumbai Traffic : पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतूक निर्बंध; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली