Dr. Medha Kulkarni : कॉर्पोरेट जिहादचा मुद्दा संसदेत मांडून कंपन्यांसाठी नियम-अटी करणार! - खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

‘कॉर्पोरेट जिहाद’ व ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानास प्रारंभ!


पुणे : केवळ ‘कॉर्पोरेट जिहाद’च नव्हे, तर जिथे संधी मिळेल, तिथे भारताचे अस्तित्व पोखरण्याचे आणि देशाचे लचके तोडण्याचे कारस्थान पद्धतशीर चालू आहे. आज ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या माध्यमातून आपल्या तरुण पिढीच्या विचारसरणीवर आणि धर्मावर जे पद्धतशीर आक्रमण होत आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. यात केवळ प्रत्यक्ष गुन्हेगारांनाच नव्हे, तर त्यांना छुप्या पद्धतीने रसद पुरवणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला आणि व्यवस्थेला कायद्याच्या चौकटीत आणून कठोर शासन करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा ‘कॉर्पोरेट जिहाद’चा मुद्दा मी आगामी काळात संसदेत मांडणार आहे. कार्पोरेट आस्थापनांमधील वाढता जिहाद रोखण्यासाठी ही आस्थापने भारतात येण्यापूर्वीच त्यांच्यावर काही बंधने, नियम अटी लागू करू शकतो का यादृष्टीने विचार चालू आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपच्या राज्यसभेतील खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या अभियानाचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित ‘कॉरर्पोरेट जिहाद’ नक्की सत्य काय ?’ या ‘विशेष संवादा’त त्या बोलत होत्या.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २३६ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ...


हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियममध्ये आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांसह कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण-तरुणींनी आणि पुणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि प्रसिद्ध लेखिका सौ. शेफाली वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.



‘लेन्सकार्ट’ व ‘टीसीएस’सारख्या कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवावा ! - शेफाली वैद्य


या वेळी बोलतांना सौ. शेफाली वैद्य म्हणाल्या की, केवळ नाशिकमधील टीसीएस ही बहुराष्ट्रीय कंपनीच नव्हे, तर पब्लिक लिमिटेड कंपनी असलेल्या ‘लेन्सकार्ट’मध्ये ‘हिजाब, पगडी चालेल; मात्र कुंकू, टीळा, कलावा चालणार नाही’, असे उघडपणे हिंदूंशी भेदभाव करणारे संविधानविरोधी नियम बनवले गेले होते. तीव्र विरोध झाल्यावर हे नियम केवळ आठ दिवसांसाठीच शिथील केले होते; हा पण कॉर्पोरेट जिहादच आहे. मुसलमान वा अन्य धर्मीयांबाबतच्या प्रथा परंपरा चालतील; मात्र हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा चालणार नाही हे शाळेपासूनची मानसिकता घेऊन हिंदू मोठा होतो. पुढे कॉर्पोरेट कल्चरमध्ये गेल्यावर बहुसंख्येने असूनसुद्धा हिंदू मुकाट्याने सर्व अन्यायकारक बंधने स्वीकारतो. भेदभाव सहन करतो. त्याची पुढची पायरी म्हणजे त्याला नाशिकमधील टीसीएस् कंपनीप्रमाणे अन्य धर्मीयांचे अत्याचार सहन करण्याची पाळी येते. अन्य धर्मीय ज्याप्रमाणे त्यांच्या प्रथा-परंपरा पाळण्यासाठी जागृत असतात. तसे हिंदूंनी स्वत:च्या धार्मिक अस्मितेसाठी कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात जागृत होऊन संघटितपणे आवाज उठवला पाहिजे. तसे झाले, तर हिंदू समाज व हिंदू संघटना त्यांच्या मागे उभ्या राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २३६ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ...



जिहादचा सामना करण्यासाठी हिंदूंमध्ये ‘स्वबोध’ व ‘शत्रुबोध’ होणे आवश्यक - श्री. रमेश शिंदे


आज समाजामध्ये घडणाऱ्या गंभीर घटना पाहता नराधमांना फाशीपेक्षाही कडक शासन करण्याची वेळ आली आहे; वर्ष ७११ मध्ये मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून सुरू झालेले हे जिहादचे षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘कॉर्पोरेट जिहाद’ अशा विविध रूपांत आजही सुरू असून, ‘गजवा-ए-हिंद’ आणि ‘व्हिजन २०४७’ च्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे लिखित मनसुबे रचले जात आहेत. काश्मीरमधील हिंदूंचा नरसंहार, अजमेर सेक्स स्कँडल आणि केरळमधील मुख्यमंत्र्यांनी उघड केलेला ‘रोमिओ जिहाद’ यांसारख्या घटनांमागे मुसलमानांची लोकसंख्या वाढवणे, हिंदू डीएनए संपवणे आणि विकृत मानसिकता जोपासणे ही मुख्य कारणे असून या संकटाचा सामना करण्यासाठी हिंदूंमध्ये ‘स्वबोध’ आणि ‘शत्रुबोध’ होणे आवश्यक आहे. पालकांनी पाल्यांशी संवाद वाढवून त्यांना हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व समजावणे आणि प्रत्येक मुलीच्या रक्षणाकरिता सर्वांनी एकजुटीने जनजागृतीचे अभियान राबवणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या प्रसंगी केले.

Tags
Parliamentlove jihadCorporate Jihadtcs companyDr. Medha KulkarniFormulate Rules

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान