Baramati Election Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांचा विश्वविक्रम

 देशातील आजवरचे सर्वाधिक मताधिक्य; राहुरीत अक्षय कर्डिले यांचाही दणदणीत विजय


मुंबई : बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून, महायुतीने एक नवा इतिहास रचला आहे. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एका अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे. दुसरीकडे, राहुरीमध्येही भाजपचे युवा नेतृत्व अक्षय कर्डिले यांनी एकतर्फी विजय मिळवत विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत.



बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी नोंदवलेले मताधिक्य हे देशातील आतापर्यंतचे सर्वोच्च मताधिक्य ठरले आहे. यापूर्वी हा राष्ट्रीय विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबादचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. २०२२ मध्ये त्यांनी २ लाख १४ हजार ८३५ मतांनी विजय मिळवला होता. मात्र, सुनेत्रा पवारांनी २ लाख १८ हजार ९३० मतांची आघाडी घेत हा विक्रम मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २०१९ मधील १ लाख ६५ हजार मतांचा राज्यातील सर्वोच्च मताधिक्याचा विक्रमही मोडीत काढला आहे.



दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांना आव्हान देणाऱ्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अपक्ष उमेदवार करुणा मुंडे यांना ६८ मते आणि अभिजीत बिचुकले यांना ६५ मते मिळाली. विशेष म्हणजे नोटा या पर्यायापेक्षाही (१५३ मते) कमी मते त्यांना मिळाली आहेत.



राहुरीत कर्डिलेंचे निर्विवाद वर्चस्व


राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी एकतर्फी विजय मिळवला. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा तब्बल १ लाख ११ हजार ८२६ मतांनी पराभव केला. अक्षय कर्डिले यांना १ लाख ३९ हजार २१२ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी गोविंद मोकाटे यांना केवळ २७ हजार ३८६ मतांवर समाधान मानावे लागले.

Comments
Add Comment

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा