Monday, May 4, 2026

मुलीचं लग्न लागल्याबरोबर इंदुरीकरांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर म्हणाले, ज्याची परिस्थिती...

मुलीचं लग्न लागल्याबरोबर इंदुरीकरांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर म्हणाले, ज्याची परिस्थिती...

Indurikar Maharaj Daughter Marriage: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे अत्यंत शाही थाटात पार पडला. साखरपुड्यापासूनच हा विवाह सोहळा चर्चेत होता. अतिशय भव्यदिव्य पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावरून इंदुरीकर महाराजांवर टीका देखील करण्यात आली. पण आपल्या परखड भाष्यामुळे प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांनी यावेळी ही आपल्या शैलीमध्ये ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिलंय.

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल (Indurikar Maharaj Daughter Marriage) यांच्याशी झाला. या विवाह सोहळ्यासाठी गुंजाळवाडी येथे तब्बल 10 एकर क्षेत्रात भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. सुमारे 3 लाख लोकांसाठी भोजन आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या शाही सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, आमदार सत्यजित तांबे, विवेक कोल्हे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

दरम्यान, ज्यावेळी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा झाला होता, त्यावेळी इंदुरीकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. आता मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी लग्नात भाषण करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. (Indurikar Maharaj Daughter Marriage)

इंदुरीकरांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

"साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली तशी ही चर्चा एक वर्षभर आरामशीर चालेल. बऱ्याच लोकांची जी शंका आहे की इंदोरीकर महाराजांनी मुलीचं लग्न एवढं मोठं का केलं? इंदोरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधेपणाने करा आणि स्वतः मुलीचं लग्न मोठं केलं तर त्याचं उत्तर असं आहे की ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय, ज्याच्यावर ज्ञानोबारायाची कृपा आहे, त्यानं जरूर करावं. दुसरी शंका लोकांना मठ्ठ्याबाबत होती, कारण मी मठ्ठ्यावर बोलतो, तर मठ्ठा मी माझ्या सर्व कार्यक्रमातून वजा केला. त्याबाबत तुम्हाला बोलण्याचे अधिकार नाहीत". पाहुण्यांसाठी पारंपरिक, सात्विक जेवणाची (गुलाबजाम आणि मट्ठा यांसारख्या काही मिठाईंशिवाय) व्यवस्था केली होती, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. (Indurikar  Maharaj Daughter Marriage)

90 टक्के खर्च भक्तमंडळाने केला- इंदुरीकर महाराज

लग्नात मी मठ्ठा , गुलाबजाम केले नाही. लग्नामध्ये मराठमोळं आणि सात्विक जेवन होतं. आज मुलगा, मुलगी मोठी झाले ते दिसत आहे. मी किर्तनासाठी फिरत असल्याने त्यांची भेट होत नव्हती, माझी आणि माझ्या मुलाची देखील तीन वर्षे झाले भेट नाही. मी विद्यालय चालवतो, एक रुपया घेत नाही. शाळेत 13 शिक्षक आहेत, लग्नानंतर आता प्रश्न विचारला जाईल एवढा पैसा कुठून आला? माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला. देणाऱ्याने दिला, त्यामुळे ट्रोल करण्याचा कोणाला अधिकार नाही, असं इंदुरीकर महाराजांनी सांगितले.

एक हटयुग आणि ज्ञानयोग...असे दोन योग...नास्तिक लोक त्यांचा मुळ स्वभाव सोडत नाही. आनंदाने, सामुहिकतेने आणि सात्विक विचारांनी झालेला हा विवाह आहे. टीका करणाऱ्यांनी नकारात्मकतेपेक्षा चांगल्या गोष्टीवर लक्ष घ्यावं, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >