सुनील नरेनचे नवे विक्रम ! आयपीएलच्या इतिहासात असं करणारा तिसरा गोलंदाज....

KKR VS SRH : वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू सुनील नरेनने आता एक नवा विक्रम आपल्या नावी केला आहे. त्याने रविवारी ३ मे रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मधल्या फळीतील फलंदाज सलील अरोराला बाद करून हा पराक्रम केला. हा बळी नरेनच्या आयपीएल करिअरमधील २०० वा बळी ठरला. या सामन्यात त्याने चार षटकात ३१ धावा देत दोन बळी घेतले.


सुनील नरेन आता भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल सोबत आयपीएलमध्ये २०० बळी घेणार तिसरा गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, नरेन २०१२ पासून केवळ कोलकाता संघासाठी खेळत आहे. एकाच संघासाठी दोनशे बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.सुनीव नरेनचे आयपीएल करिअर उल्लेखनीय आहे. त्याने ११७ सामन्यात २५ च्या सरासरीने २०० बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट इतर गोलंदाजांपेक्षा उत्तम आहे. आयपीएयच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ६.८ ची त्याची इकॉनॉमी सर्वोत्तम आहे. त्याने आयपीअलमध्ये आठ वेळा चार किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एक हॅट-ट्रिक पण आहे.


कोलकाता नाईट रायडर्सचा सात विकेट राखून विजय


हैदराबाद येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना झाला. नाणेफेक जिंकून हैदराबादने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी १९ षटकांत सर्वबाद १६५ धावा केल्या. तर कोलकाता नाईट रायडर्सने १८.२ षटकांत तीन बाद १६९ धावा करून सामना सात विकेट राखून सहज जिंकला. चार षटकांत ३६ धावा देत तीन बळी घेणारा कोलकाताचा वरुण चक्रवर्ती सामनावीर झाला.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची