Metro Line 4 : मुंबई मेट्रो लाईन ४ अपघातांबाबतचे चौकशी अहवाल सार्वजनिक करा - मुलुंड भाजप आमदार मिहिर कोटेचा

आमदार मिहिर कोटेचा यांचे एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्र


मुलुंडमधील प्रकल्पात वारंवार सुरक्षा त्रुटी गंभीर — आमदार मिहिर कोटेचा


दोषींवर कठोर कारवाईची केली जावी — आमदार कोटेचा


मुंबई: धावत्या कारवर लाकडी फळी कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पत्र लिहून तात्काळ चौकशी करण्याची तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच पॅरापेट भिंत कोसळल्याच्या आधीच्या घटनेच्या चौकशी अहवालाची प्रत सार्वजनिक करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.


एमएमआरडीए चे आयुक्त संजय मुखर्जी यांना पाठवलेल्या पत्रात कोटेचा यांनी मुलुंड पश्चिम येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पस्थळी वारंवार होणाऱ्या सुरक्षा त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. एकाच ठिकाणी अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असल्याने ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.


आमदार कोटेचा यांनी पुढे सांगितले की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी पॅरापेट भिंतीचा एक भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर तिघेजण जखमी झाले होते. सोमवारी सकाळी त्याच ठिकाणापासून अवघ्या १० मीटर अंतरावर आणखी एक घटना घडली. त्यात लाकडी फळी धावत्या कारवर कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना पुन्हा घडत असल्याने गंभीर निष्काळजीपणा आणि सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


या वारंवार घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लाकडी फळी कोसळल्याच्या घटनेची तात्काळ चौकशी करण्यात यावी, तसेच पॅरापेट भिंत कोसळल्याच्या आधीच्या चौकशी अहवालाची प्रत देण्यात यावी, अशी मागणी कोटेचा यांनी केली. त्यांनी मिलान बिल्डटेक एलएलसी यांना दिलेला करार रद्द करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.


नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असली पाहिजे. अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या सुरक्षा त्रुटी सहन केल्या जाणार नाहीत. जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एमएमआरडीएने तात्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान