Honeybee Attack: वेरूळ लेणीमध्ये मधमाशांचा हल्ला; १०० पर्यटक जखमी, एकाची प्रकृती गंभीर

छत्रपती सांभाजीनगर : वेरूळ लेणी परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक लेणी पाहण्यासाठी आले असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. या घटनेत सुमारे १०० पर्यटक जखमी झाले असून, एका महिला पर्यटकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.



मे महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे राज्यासह इतर भागांतूनही हजारो पर्यटक वेरूळ लेणी पाहण्यासाठी आले होते. लेणी क्रमांक १६ (कैलास लेणी) आणि लेणी क्रमांक १० परिसरात मोठी गर्दी असतानाच अचानक मधमाशांचे पोळे हलले आणि मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वत्र धावपळ उडाली.

या हल्ल्यात अनेकांना मधमाशांनी चावे घेतले. जखमींपैकी एका महिलेला मोठ्या प्रमाणात दंश झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी त्या परिसरातील प्रवेश बंद केला आहे. सुट्टीच्या हंगामात घडलेल्या या प्रकारामुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी