GT VS PBKS : सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात गुजरात; पंजाब किंग्स पुनरागमनासाठी सज्ज

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज ( 5 मे शनिवार ) संध्याकाळी 7:30 वाजता गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात महत्त्वाची लढत रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळाला जाणार आहे. सलग दोन सामने जिंकत आत्मविश्वास वाढवलेल्या गुजरातचा संघ तिसऱ्या विजयासाठी प्रयत्न करणार आहे, तर नुकत्याच झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्स पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने यंदाच्या हंगामात आतबूत कामगिरी केली आहे. सात सामने जिंकल्यानंतर त्यांना अलीकडेच राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. तरीही १३ गुणांसह पंजाब गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांच्या मागोमाग बंगळूर, हैदराबाद, राजस्थान आणि गुजरात हे संघ आहेत. त्यामुळे गुजरातविरुद्धचा हा सामना पंजाबसाठी आपले आवल स्थान बक्कम करण्यास महत्त्वाचा ठरणार आहे.



पंजाबचा कमकुवतपणा


पंजाबची फलंदाजी सध्या जोरात दिसत असली तरी गोलंदाजीत काही उणिवा दिसत आहेत. पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत दिल्लीने २६४ धावा केल्या होत्या. पण पंजाबच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत हा सामना खिशात टाकला होता. त्यानंतर राजस्थानविरुद्ध २२२ धावांचे आव्हान देऊनही त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यामुळे गोलंदाजीत सुधारणा करणे पंजाबसाठी अत्यावश्यक आहे.


फलंदाजीच्या बाबतीत मात्र पंजाब मजबूत आहे. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग पॉवरप्लेमध्ये जलद धावा करत संघाला चांगली सुरुवात देत आहेत. त्यानंतर कूपर कॉनॉली आणि कर्णधार श्रेयस अय्यर मधल्या फळीत उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत.दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स सध्या चांगल्या लयीत दिसत आहे. त्यांनी चेन्नई आणि बंगळुरू यांना पराभूत करत सलग दोन विजय मिळवले आहेत आणि १० गुणांसह गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. गुजरातच्या यशात शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जॉस बटलर यांच्या फलंदाजीचा मोठा वाटा आहे. मधल्या फळीत वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान आणि राहुल तेवतिया यांच्याकडूनही संघाला योगदान मिळण्याची अपेक्षा आहे. जेसन होल्डरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे संघाला समतोल मिळाला आहे. बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या. गुजरातची गोलंदाजी सध्या संघाची मोठी ताकद आहे. राशीद खाननेही चांगली लय मिळवली असून त्याची कामगिरी गुजरातसाठी महत्त्वाची ठरू शकते.



संभाव्य प्लेइंग इलेव्हन


गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, राशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार.


पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कॉनॉली, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची