Nails Free Tree : मुंबईतील १०७१ झाडे काँक्रीटमुक्त, झाडांवरील ५० किलो खिळ्यांच्या वेदनांचा भार केला हलका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठे यश मिळत असून, वृक्ष संजीवनी अभियान अंतर्गत मुंबईतील तब्बल १०७१ झाडांना काँक्रीटच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवती अनेक वर्षांपासून असलेले सिमेंट-काँक्रीट काढून टाकल्यामुळे या झाडांना पुन्हा नैसर्गिकरीत्या पाणी व पोषकद्रव्ये शोषण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या झाडांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे.


मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने वृक्ष संजीवनी अभियान हाती घेण्यात आले आहे. मागील एक ते तीस एप्रिल २०२६ या कालावधीत झाडांच्या मुळावरील सिमेंट काँक्रिटचा थर, झाडांना ठोकलेले खिळे, वायर, पोस्टर हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. झाडांच्या खोडांमध्ये जाहिराती, बॅनर्स आणि केबल्स लावण्यासाठी ठोकण्यात आलेले तब्बल ४,२४० खिळे काढून टाकण्यात आले. या खिळ्यांचे आणि केबल्सचे एकत्रित वजन ५० किलोपेक्षा अधिक असल्याचे समोर आले. खिळ्यांमुळे झाडांना होणारी जखम, संसर्ग आणि हानी टाळण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.


याशिवाय, झाडांचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी १,१०२ पोस्टर्स हटवण्यात आले. झाडांवर अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे केवळ सौंदर्यच नाही, तर झाडांच्या खोड आणि सालीलाही नुकसान होत होते. या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांचे सौंदर्यही अधिक खुलले आहे.


मुंबईतील तब्बल १०७१ झाडांना काँक्रीटच्या विळख्यातून मुक्त करण्यात आले आहे. झाडांच्या बुंध्याभोवती अनेक वर्षांपासून असलेले सिमेंट-काँक्रीटचा थर काढून टाकल्यामुळे या झाडांना पुन्हा नैसर्गिकरीत्या पाणी व पोषकद्रव्ये शोषण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे काँक्रीटमुळे झाडांच्या मुळांना हवा व पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटते आणि झाडे कमकुवत होतात. या मोहिमेमुळे झाडांच्या आरोग्यात सकारात्मक बदल अपेक्षित आहे.


या संपूर्ण उपक्रमात ४१४ विद्यार्थी, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शहरातील हरित संपत्तीचे जतन करण्यात मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यातही अशा उपक्रमांची गरज अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध