'Raja Shivaji' Box Office Collection: 'राजा शिवाजी' चित्रपटाने घडवला इतिहास; पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

-शिवरायांचा पराक्रम पाहून प्रेक्षक भारावले


मुंबई: १ मे २०२६ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार ओपनिंग केली आहे. महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना सर्वत्र भावलेला दिसत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' सध्या देशभरात प्रचंड चर्चेत आहे.


'राजा शिवाजी' चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई किती?


सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी सुमारे ₹११.३५ कोटींची कमाई केली आहे. यापैकी मराठी व्हर्जनमधूनच जवळपास ₹८ कोटींचे नेट कलेक्शन झाले आहे. मराठी चित्रपटासाठी ही कमाई उल्लेखनीय मानली जात आहे. अवघ्या १,९४१ शोमधून ६८% इतकी मजबूत ऑक्युपन्सी मिळवत चित्रपटाने मोठी कामगिरी बजावत प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.



ॲडव्हान्स बुकिंगमधूनच मिळाला होता इशारा


चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘राजा शिवाजी’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ₹५.१४ कोटी ग्रॉस कमाई केली होती. त्यात मराठी व्हर्जनचा वाटा सुमारे ₹३.६० कोटी इतका होता. त्यामुळे ओपनिंग दमदार होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते.


'राजा शिवाजी' चित्रपटाने जुन्या विक्रमांना टाकलं मागे


पहिल्या दिवसाच्या कमाईत या चित्रपटाने ‘सैराट’ आणि ‘टाईमपास २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. त्या दोन्ही चित्रपटांनी पहिल्या दिवशी सुमारे ₹३.६० कोटी कमावले होते. 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधूनही सुमारे ₹३.३५ कोटींची भर पडल्याने एकूण कमाईने ₹१० कोटींचा टप्पा सहज पार केला.


चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांना मोठी उत्सुकता होती. रिलीजपूर्वीच या चित्रपटाची सुमारे २,०१,९९० तिकीटांची विक्री झाली होती. तब्बल ५,६९८ शोसह प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाकडून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कमाईची अपेक्षा सध्या व्यक्त होताना दिसत आहे.


‘राजा शिवाजी’ मध्ये बॉलीवूड सितारे संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, अमोल गुप्ते तर मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, आणि जेनेलिया देशमुख अशी दमदार स्टारकास्ट आहे. याशिवाय बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा खास केमिओही सध्या प्रचंड चर्चेत आहे.
Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Dilip Kumar : ७८ वर्षांपूर्वी गाजलेलं बॉलिवूडचं देशभक्तीपर गाणं! मोहम्मद रफींचा आवाज, दिलीप कुमार यांच्यामुळे अजरामर झालेला इतिहास

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीपर गाण्यांनी वातावरण भारून जातं. ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की

Swara Bhasker News : स्वरा भास्करचा ट्रोलर्सवर जोरदार हल्लाबोल! 'त्या' एका वाक्याने बंद केली नेटकऱ्यांची बोलती

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. फहाद अहमद यांच्याशी

Rakesh Bedi : “भेसळ करणाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा!”; ‘धुरंधर’ फेम राकेश बेदींची संतप्त मागणी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : आर्थिक फायद्यासाठी अन्न, पेये आणि मद्यामध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली

Ajay Devgan : बाॅलिवूडचा सिंघम 'अजय देवगण' लवरकच झळकणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अभिनेता 'अजय देवगण' आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर