Pune Nasarapur Crime : आधी पुतणीवर अतिप्रसंग, मग महिलेवर अत्याचार अन् आता 4 वर्षाच्या चिमुकलीचा बळी; भोरमधील नराधमाचा काळा इतिहास उघड!

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वासरू दाखवण्याच्या बहाण्याने एका ६५ वर्षीय वृद्धाने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केले. आपले बिंग फुटू नये म्हणून या नराधमाने चिमुकलीची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृतदेह गोठ्यातच दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मुलगी बेपत्ता असल्याने शोधाशोध करणाऱ्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह त्याच गोठ्यात आढळून आल्याने मोठा धक्का बसला. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाबाबतची माहिती दिली आहे.



पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी म्हटलंय...



नसरापूर येथील भीषण घटनेवर बोलताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्पष्ट केले की, काल संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला. सव्वा पाच वाजता पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या दीड तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत या नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे गिल यांनी सांगितले.



यापूर्वीही पोक्सोचे गुन्हे; जलदगती न्यायालयात खटला चालवणार - पोलीस अधीक्षक


या प्रकरणातील ६५ वर्षीय आरोपी हा मजुरीचे काम करत असून, तो सराईत गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, या विकृत नराधमावर यापूर्वी १९९८ मध्ये विनयभंगाचा आणि २०१५ मध्ये पोक्सो तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. मात्र, २०१९ मध्ये तो सुटून बाहेर आला होता. त्याची मानसिकताच गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास एका विशेष पथकाद्वारे केला जात असून, लवकरात लवकर दोषारोपपत्र (चार्जेसशीट) दाखल करून हा खटला फास्ट ट्रॅक (जलदगती) न्यायालयात चालवण्याचे आश्वासन पोलिसांनी नागरिकांना दिले आहे.



सीसीटीव्हीने फोडले नराधमाचे बिंग...


उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीच्या गावी आलेल्या एका निष्पाप चिमुकलीचा असा दुर्दैवी शेवट होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. दुपारच्या वेळी मुलगी अचानक बेपत्ता झाल्यावर घाबरलेल्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हा नराधम आरोपी तिला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्ट दिसला आणि या भयंकर गुन्ह्याचा उलगडा झाला. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, संतप्त ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून

Ahilyanagar : हृदयद्रावक ! भीषण अपघातात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू ; परिसरात हळहळ

Ahilyanagar : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. मंगळवारी सायंकाळी कंटेनर,

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात