बेडवर चल...डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली, थेट महिला खासदाराला…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) कधी काय बोलतील आणि कधी काय करतील याचा काय नेम नाही. अर्थात या कृत्यांमुळे वारंवार त्यांच्यावर टीका देखील झाली आहे. मात्र ट्रम्प यांची शेपूट वाकडी ती वाकडीच. आता पुन्हा एकदा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रम्प टीकेचे धनी ठरले आहे. यांनी थेट महिला खासदाराच्या बोलण्याच्या टोनची नक्कल करत वाद ओढावून घेतला आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील एका रॅलीदरम्यान अमेरिकन मुस्लिम काँग्रेसवुमन इल्हान ओमर यांच्या बोलण्याच्या टोनची नक्कल केली. ज्यात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इल्हान ओमर यांच्यावर गंभीर आरोप केलेत, ओमर यांनी आपल्या भावाशी लग्न केल्याचा खळबळजनक आरोप ट्रम्प यांनी केलाय. बोलता बोलता ट्रम्प यांची जीभ घसरली. आपल्या भाषणादरम्यान, ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांचा उल्लेख केला, तेव्हा त्यांच्या नागरिकत्वावर तसेच त्या अमेरिकेत कशा आल्या यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी मंचावरून ट्रम्प (Donald Trump) यांनी एक जुनी आणि विवादीत अफवा पुन्हा पसरवली. ” मला वाटतं की तिने तिच्या भावाशी लग्न केलं आहे, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. खरं तर, ते एक चांगलं जोडपं आहेत, पण हे थोडे बेकायदेशीर आहे” असं ते म्हणाले.


ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी मंचावरून त्या कथित संबंधांची खिल्ली उडवली, इतकेच नव्हे तर एका काल्पनिक संभाषणाची नक्कलही केली. ट्रम्प उपहासाने म्हणाले : “डार्लिंग, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गुडनाइट भावा. बेडवर चला झोपूया.” ट्रम्प (Donald Trump) यांच्या या वक्तव्यामुळे गर्दीत खळबळ उडाली. “ती किळसवाणी आहे ना? मी तिच्याकडे पाहूही शकत नाही.” असं ट्रम्प तिरस्कार व्यक्त करत म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांची ही टिप्पणी एका दीर्घकाळ चाललेल्या वादातून उद्भवली आहे. पुराणमतवादी बऱ्याच काळापासून असा दावा करत आहेत की इल्हान ओमर यांनी स्वतःच्याच भावाशी लग्न केले होते. पण या सभेत ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांच्या उच्चारांची नक्कल केली, विशेषतः ‘भाऊ’ या शब्दाचा वापर केला, त्यांचा याच दाव्याकडे निर्देश होता.


त्यानंतर ट्रम्प यांनी काँग्रेस सदस्या इल्हान ओमर आणि त्यांच्या मूळ देश सोमालियावर (Somalia) टीका केली. “एक सुंदर ठिकाण” अशी उपहासात्मक टिप्पणी करत त्यांनी सोमालियाचे वर्णन केलं. तिथे सरकार किंवा सैन्य नाही; फक्त गरिबी, प्रदूषण आणि गुन्हेगारी आहे असंही पुढे ते म्हणाले. ओमर जगातील सर्वात वाईट परिस्थिती असलेल्या देशातून आल्या आहेत आणि त्या येथील लोकांना देश कसा चालवायचा हे शिकवण्यासाठी अमेरिकेत आल्या आहेत, असं म्हणत त्यांनी इल्हान ओमर यांच्यावर वैयक्तिक हल्ला केला. एवढंच नव्हे तर ट्रम्प यांनी ओमर यांना ढोंगी म्हटले आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या मागणीवर नाराजी व्यक्त करत त्यांना देशाबाहेर काढण्याची मागणी केली.

Comments
Add Comment

Iran Attack : इराणकडून जॉर्डन-कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याचा दावा

तेहरान : इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि इराणी सैन्याने गुरुवारी कुवेत आणि जॉर्डनमधील

Iran-US War :ट्रम्प प्रशासनासमोर आर्थिक आव्हान; इराणसह युद्धासाठी नव्या निधीची गरज

Iran-US War : इराण-अमेरिका युद्ध (Iran-US War) पुन्हा तीव्र होत असताना अमेरिकेच्या संरक्षण खर्चात (Defense Spending) मोठी वाढ झाली आहे.

Amazon Data Center : Amazon च्या डेटा सेंटरवर इराणच्या हल्ल्याचा दावा; AWS सेवांवर परिणामाची चर्चा, मात्र अधिकृत पुष्टी नाही

तेहरान : इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने बहरीनमधील Amazon Web Services (AWS) च्या महत्त्वाच्या डेटा

Afghanistan Floods : अफगाणिस्तानात भीषण पुराचा तडाखा: २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक बेपत्ता; बचावकार्य सुरू

काबुल: अफगाणिस्तानमध्ये सोमवारी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान २० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक

Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये मुंबईच्या कंपनीच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ४ भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली : युक्रेन-रशिया युद्धाच्या (Ukraine-Russia War) पार्श्वभूमीवर भारताला मोठा धक्का बसला आहे. युक्रेनमधील ओडेसा बंदर

India Iran : तेहरानचा प्रवास पुढे ढकला, इराण तातडीने सोडा', भारतीय दूतावासाची नागरिकांसाठी सूचना

तेहरान: अमेरिकेसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषणा झाल्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला