Nashik : नाशिकमधील धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमावर टांगती तलवार; कारण...

नाशिक : धीरेंद्रकृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबा (Bageshwar Dham Baba) यांचा आज २ मे रोजी शहराजवळील गोवर्धन शिवारात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमावर टांगती तलवार आहे. कारण यासाठी अंनिसकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. चमत्काराचे दावे करुन अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या आणि महाराष्ट्रातील संत व महापुरुषांविषयी वारंवार अपशब्द वापरणाऱ्या या बाबाचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच धीरेंद्र शास्त्रींनी जर चमत्कार सिध्द केला तर २१ लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येईल, असे आव्हान धीरेंद्र शास्त्री यांना करण्यात आले आहे. (Nashik Dhirendra Shastri's program)


अंनिसचे आव्हान काय ?


धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अटी- शर्ती,नियम पाळून कोणत्याही शासकीय इमारतीच्या खोलीमध्ये त्या विषयांचे तज्ज्ञ, शासकीय अधिकारी, पोलीस, पत्रकार आणि त्यांचे व संघटनेचे मोजके पदाधिकारी यांच्या समक्ष आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर दैवी चमत्कारिक दावे सिद्ध करावेत. त्याशिवाय, अंनिसने दिलेल्या १० व्यक्तींच्या मनातील प्रश्न ओळखावेत, त्यांचे नाव , गाव व पत्ता सांगावा. असे त्यांनी करून दाखविल्यास चमत्कार सिद्धीसाठी महाराष्ट्र अंनिसचे २१ लाखांचे पारितोषिक त्यांना मिळेल. (Nashik Dhirendra Shastri's program)


कार्यक्रम रद्द करण्याची मागणी


अंधश्रद्धांना खतपाली घालणाऱ्या आणि महापुरुषांच्या आणि संतांच्या बद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या धीरेंद्रकृष्ण शास्त्रीचा नाशिकमध्ये होणारा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी अंनिसने केली आहे. कार्यक्रम रद्द न झाल्यास अंनिस समविचारी संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

MPSC Group C 2026: उमेदवारांची धाकधूक वाढली! तलाठीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; साईट डाऊन होण्याआधी करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तलाठी (ग्राम महसूल

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरची ट्रकला धडक, ट्रकखाली कार चिरडली

पुणे :  पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे 6.15 वाजता भीषण अपघात झाला. नाशिकहून पुण्याकडे

Dubai Explosion : दुबई हादरली! जेबेल अली अन् पाम जुमेराहजवळ भीषण स्फोट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात

MHADA Lottery 2026 : अखेर प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या घरांची सोडत 6 ऑगस्टला; 2,640 घरांसाठी 75 हजार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या

BMC News : मुंबईतील पदपथ अतिक्रमण मुक्तीत सहायक अभियंता, परवाना निरिक्षकांची मानसिकता कुठे?

सहायक आयुक्त कुठे कुठे डोक फोडणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरणार? अल निनोचा प्रभाव वाढणार; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून पुढील दोन महिन्यांत अल निनोचा प्रभाव अधिक तीव्र