चेन्नई विरूद्धच्या सामन्यात मुंबईला मोठा फटका, सूर्यकुमार पुन्हा अपयशी

चेन्नई : आयपीएल २०२६ मधील ४४ वा साखळी सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. या मॅचमध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला आहे. सूर्यकुमार पुन्हा अपयशी झाला आहे. सूर्यकुमार यादव १२ चेंडूत एक षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर २१ धावा करून बाद झाला आहे. रामकृष्ण घोषच्या चेंडूवर सूर्याचा डेवाल्ड ब्रेविसने झेल घेतला.सूर्यकुमार यादव संघाला अपेक्षित मोठी खेळी करण्यात अपयशी झाला. यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईचा संघ २० षटकांत सात बाद १५९ धावा एवढीच मजल मारू शकला.


आयपीएल २०२६ मध्ये सूर्यकुमारची कामगिरी


यंदाच्या आयपीएल मध्ये सूर्याचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय झाला आहे. सूर्या सुरूवात तर चांगली करतो पण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. आयपीएल २०२६ मध्ये २०.२५ च्या सरासरीने त्याने १६२ धावा केल्या आहेत. दिल्ली विरूद्ध अर्धशतक ही त्याचा यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे संघाला फलंदाजीत सतत बदल करावे लागले आहेत. यामुळे टीमचे संतुलन डगमगले आहे.


सूर्याबद्दल काय म्हणाले महेला जयवर्धने ?


मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने पत्रकार परिषेदेत म्हणाले, बघा, त्याने आत्ताच कर्णधार म्हणून वर्ल्ड कप जिंकला आहे आणि गेल्या वर्षी तो ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ होता. मग तुम्ही अजून काय म्हणू शकता? आम्ही त्याच्याशी याबद्दल चर्चा केली आहे. जर तुम्ही नेटमधील त्याची फलंदाजी पाहिली, तर तो इतर कोणत्याही खेळाडूप्रमाणेच उत्तम सराव करत आहे. सामन्यांमध्येही तो चेंडू चांगल्या प्रकारे हिट करत आहे. पण ज्या पद्धतीने तो काही वेळा बाद झाला आहे, ते दुर्दैवी होतं. कधीकधी तो एखादा शॉट मारतो आणि बाउंड्रीवर झेलबाद होतो, तर कधी त्याला काही चांगल्या चेंडूंचा सामना करावा लागतो.” जयवर्धने यांनी पुढे सांगितले की, त्याने गेल्या ३-४ वर्षात शानदार कामगिरी केली आहे. आम्ही त्याला फक्त प्रोत्साहन देत आहोत. लवकरच तो चेहऱ्यावर हसू आणून पुनरागमन करेल आणि त्याच शैलीत खेळेल ज्यासाठी तो ओळखला जातो...


मुंबई इंडियन्सी फलंदाजची ढेपाळली


मुंबई इंडियन्सचे कागदावर बळकट असणारी फलंदाजी पुन्हा एकवार कागदावरच राहीली असून नमन धीरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला प्रभावी कामगिरी न करता असल्याने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये सात बळींच्या मोबदल्यात अवघ्या १५९ धावापर्यंतच मजल मारणे त्यांना शक्य झाले आहे.


१५९ धावांमध्ये सलामीवीर विल जॅक्स १ धावा, यष्टीरक्षक रायन रिकेल्टनच्या २४ चेंडूमध्ये ३७ धावा, नमन धीरच्या ३७ चेंडूत ५७ धावा, सूर्यकुमार यादवच्या १२ चेंडूत २१ धावा, तिलक वर्मा ५ धावा, कर्णधार हार्दीक पंड्या १८ धावा, रॉबिन मिंझ ५ धावा, कृष भगत नाबाद ३ धावा, ट्रेंट बोल्ट नाबाद ७ धावा, अतिरिक्त ५ धावांचा समावेश आहे.


अंशुल कंबोज याने ४षटकांमध्ये ३२ धावा देत ३ बळी घेतले. नूर अहमदने २६ धावांत २ बळी, रामकृष्ण घोषने २४ धावांत १ बळी, जेमी ओव्हरटनने २३ धावांत १ बळी घेत मुंबईच्या धावसंख्येला लगान घातला.
मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आव्हान टीकवण्यासाठी ज्या अपेक्षित धावा हव्या होत्या, त्या त्यांना बनवता आल्या नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना मुंबई इंडियन्सला कमी धावसंख्येवर रोखले. पण, त्यांच्या या कमी धावांनीही वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला संघ ठरला.


विल जॅक्स ( १) दुसऱ्या षटकात माघारी परतल्यानंतर रायन रिकल्टन व नमन धीर यांनी ५८ धावांची भागीदारी करून MI ला सावरले. रिकल्टन २४ चेंडूंत ५ षटकारासह ३७ धावांवर बाद झाला. रामकृष्ण घोषने अफलातून झेल घेत त्याला माघारी पाठवले. सूर्यकुमार यादवला आजही अपयश आले. घोषने त्याला २१ धावांवर बाद केले. तिलक वर्मा ( ५), कर्णधार हार्दिक पांड्या ( १८) व रॉबिन मिंझ ( ५) हेही अपयशी ठरले. नमन धीरने ३७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावांची चांगली खेळी केली, परंतु मुंबईला ७ बाद १५९ धावांपर्यंतच पोहोचता आले. सीएसकेच्या अंशुल कंबोजने ३२ धावांत ३ विके्टस घेतल्या. नूर अहमदने दोन, घोष व जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात ११४ धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५० हजार धावा करणारा हा पहिला संघ ठरला.

Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची